रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं

...अन् आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा केएल राहुल पहिला भारतीय ठरला

By सुशांत जाधव | Updated: April 25, 2026 17:48 IST2026-04-25T17:45:07+5:302026-04-25T17:48:35+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 DC vs PBKS KL Rahul Becomes First Indian In IPL History To Achieve Massive Feat Highest Individual Score Record Not Even Rohit Sharma Virat Kohli | रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं

रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं

IPL 2026 DC vs PBKS KL Rahul Highest Individual Score In IPL History : अरुण जेटली स्टेडिमवर पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर लोकेश राहुल याने ऐतिहासिक खेळी साकारली. या सामन्यात केएल राहुलनं ६७ चेंडूत १६ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १५२ धावांची नाबाद खेळी केली. आयपीएलच्या १९ वर्षांच्या इतिहासात कोणत्याही भारतीय खेळाडूनं केलेली ही सर्वोच्च धावंसंख्या ठरली. जे रोहित शर्मा आणि विराट कोहली या सारख्या दिग्गजांना जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आयपीएलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम हा ख्रिस गेलच्या नावे आहे. २०१३ च्या हंगामात  बंगळुरुच्या संघाकडून पुणे वारियर्स इंडिया विरुद्ध खेळताना गेलनं १७५ धावांची वादळी खेळी साकारली होती. या यादीत ब्रेंडन मॅक्युलम दुसऱ्या स्थानावर आहे. IPL च्या पहिल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याने आरसीबी विरुद्ध नाबाद १५८ धावांची खेळी केली होती. त्यापाठोपाठ केएल राहुल तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. IPL  मध्ये १५० धावांचा आकडा गाठणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का

आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारे फलंदाज

१७५* ​​- ख्रिस गेल (आरसीबी) विरुद्ध पीडब्ल्यूआय, बंगळूर, २०१३
१५८* - ब्रेंडन मॅक्युलम (केकेआर) विरुद्ध आरसीबी, बंगळूर, २००८
१५२* - केएल राहुल (डीसी) विरुद्ध पीबीकेएस, दिल्ली, २०२६
१४१ - अभिषेक शर्मा (एसआरएच) विरुद्ध पीबीकेएस, हैदराबाद, २०२५
१४०* - क्विंटन डी कॉक (केकेआर) विरुद्ध एलएसजी, मुंबई डीवायपी, २०२२
 

पंजाब किंग्स विरुद्धच्या नाबाद १५२ धावांच्या खेळीसह टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही आता लोकेश राहुलच्या नावे झाला आहे. याआधी तिलक वर्मा या यादीत  अव्वलस्थानावर त्याने देशांतर्गत टी-२० क्रिकेटमध्ये मेघालय विरुद्धच्या सामन्यात १५१ धावांची नाबाद खेळी साकारली होती. या यादीतही रोहित-विराट यांची नावे दिसत नाहीत.

टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड

  • १५२* - केएल राहुल वि पीबीकेएस, दिल्ली, २०२६
  • १५१ - तिळक वर्मा विरुद्ध मेघालय, राजकोट, २०२४
  • १४८ - अभिषेक शर्मा विरुद्ध बंगाल, सिकंदराबाद, २०२५
  • १४७ - श्रेयस अय्यर विरुद्ध सिक्कीम, इंदूर, २०१९
  • १४६* - पुनित बिश्त विरुद्ध मिझोराम, चेन्नई, २०२१

Web Title : केएल राहुल का रिकॉर्ड तोड़ प्रदर्शन: रोहित, विराट को पछाड़ा!

Web Summary : केएल राहुल ने दिल्ली में पंजाब किंग्स के खिलाफ 67 गेंदों में नाबाद 152 रन बनाए, जो आईपीएल इतिहास में किसी भारतीय खिलाड़ी का सर्वोच्च व्यक्तिगत स्कोर है। उन्होंने भारत के लिए टी20 क्रिकेट में पिछले रिकॉर्ड को तोड़ दिया।

Web Title : KL Rahul's Record-Breaking IPL Innings: Surpasses Rohit, Kohli!

Web Summary : KL Rahul smashed an unbeaten 152 off 67 balls against Punjab Kings in Delhi, achieving the highest individual score by an Indian in IPL history. He surpassed previous records in T20 cricket for India.