DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?

DC vs PBSK यांच्यातील सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 18:17 IST2026-04-25T18:14:48+5:302026-04-25T18:17:26+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Ambulance comes on ground as Lungi Ngidi stretchered off with head injury in DC vs PBKS | DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?

DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्धच्याआयपीएल २०२६ च्या सामन्यादरम्यान डोक्याला दुखापत झाल्याने दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनिग्डीला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. पंजाब किंग्सच्या डावाच्या तिसऱ्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर झेल घेताना तो दुखापतग्रस्त झाला. 

नेमकं काय घडलं?

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्याती दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज पीबीकेएसचा सलामीवीर प्रियांश आर्याला बाद करण्याच्या प्रयत्नात मिड-ऑफवरून मागे सरकत होता. डोक्यावरून जाणाऱ्या चेंडूपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात, त्याचा तोल गेला आणि त्याचे डोके जमिनीवर आदळले. त्याला तात्काळ वेदना होऊ लागल्या, तो अस्वस्थतेने आपले डोके धरून बसला आणि बराच वेळ जमिनीवर  पडून राहिला. ॲम्ब्युलन्समधून त्याला रुग्णालयात नेण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

कन्कशन सब्स्टीट्यूटच्या रुपात दुशमंथा चमीराला संधी

केएल राहुल आणि नितीश राणा यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने निर्धारित २० षटकात २ बाद २६४ धावा केल्या आहेत. विक्रमी धावसंख्येचा बचाव करताना लुंगी एनिग्डी हा दिल्ली कॅपिटल्ससाठी महत्त्वपूर्ण गोलंदाज होता. पण तो दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला. लुंगी एनिग्डीच्या जागी कन्कशन सब्स्टीट्यूटच्या रुपात  श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुशमंथा चमीरा याला खेळवण्याचा निर्णय दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने घेतला.

Web Title : DC vs PBKS: IPL मैच के दौरान खिलाड़ी को गंभीर चोट!

Web Summary : दिल्ली के अरुण जेटली स्टेडियम में DC बनाम PBKS IPL मैच के दौरान, DC के गेंदबाज लुंगी एनगिडी को कैच लेने की कोशिश में सिर में चोट लग गई। मैदान पर सिर लगने के बाद उन्हें स्ट्रेचर पर ले जाया गया।

Web Title : Serious Injury to Player During DC vs PBKS IPL Match!

Web Summary : During the DC vs PBKS IPL match at Delhi's Arun Jaitley Stadium, DC bowler Lungi Ngidi suffered a head injury while attempting a catch. He was stretchered off the field after hitting his head hard on the ground.