क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 17:36 IST2026-04-25T17:36:08+5:302026-04-25T17:36:48+5:30

पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब येथे एकतर्फी प्रेमातून अंगणवाडी सेविकेची हत्या करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील ओळखीनंतर आरोपीने २३१ किमी प्रवास करून येत हा गुन्हा केला.

The height of cruelty! Teeth were broken, head was smashed and finally... a mother of 2 children was killed out of anger for being blocked | क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं

AI Generated Image

'तू माझी नाहीस तर कोणाचीच नाही', या विकृत मानसिकतेतून पंजाबमध्ये एका तरुणाने दोन मुलांच्या आईची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. ३० वर्षीय अंगणवाडी सेविका रमणदीप कौर हिचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून पोलिसांचाही थरकाप उडाला. आरोपीने तब्बल २३१ किलोमीटरचा प्रवास करून येत या हत्याकांडचा कट रचला आणि अत्यंत निर्दयीपणे तिला संपवले.

सोशल मीडियावरील ओळख ठरली काळ!

मृत रमणदीप कौर आणि २० वर्षीय आरोपी करनदीप सिंह यांची ओळख सहा महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. दोघांमध्ये संवाद सुरू होता, मात्र काही काळाने रमणदीपला करनदीपचा स्वभाव संशयास्पद वाटू लागला. तिने त्याच्याशी बोलणे बंद केले आणि त्याचा नंबर ब्लॉक केला. हीच गोष्ट करनदीपच्या वर्मी लागली आणि त्याने बदला घेण्याचे ठरवले.

अंगावर काटा आणणारे कृत्य

२२ एप्रिलच्या सकाळी आरोपी करनदीप थेट रमणदीपच्या अंगणवाडी केंद्रात घुसला. तिथे त्यांच्यात जोरदार वाद झाला. संतापलेल्या करनदीपने सोबत आणलेल्या पेपर कटरने रमणदीपवर हल्ला केला. त्याने केवळ तिचा गळाच चिरला नाही, तर तिला इतकी अमानुष मारहाण केली की तिचे दातही तुटले. मृतदेह पूर्णपणे छिन्नविछिन्न करून तो घटनास्थळावरून पसार झाला.

रक्ताने माखलेले हात अन् चालकाचा संशय

हत्येनंतर आरोपीने लिफ्ट घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका वाहन चालकाला त्याच्या रक्ताने माखलेल्या हातांचा संशय आला. चालकाने त्याला मध्येच उतरवले आणि पोलिसांना सुगावा लागला. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने करनदीपला बेड्या ठोकल्या आहेत.

दोन चिमुरड्यांचे छत्र हरपले

रमणदीपचा विवाह २०१७ मध्ये झाला होता आणि तिला दोन लहान मुले आहेत. तिच्या पतीचे, गुरुचरण सिंह यांचे सांत्वन करणे कठीण झाले आहे. "घटनेच्या काही वेळ आधीच माझे पत्नीशी बोलणे झाले होते, आणि काही वेळातच हे भयानक संकट कोसळले," अशा शब्दांत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त केले आहे. 

Web Title : क्रूरता की हद: ब्लॉक करने पर दो बच्चों की मां की हत्या

Web Summary : पंजाब में एक व्यक्ति ने सोशल मीडिया पर ब्लॉक करने पर दो बच्चों की मां की बेरहमी से हत्या कर दी। आरोपी 231 किलोमीटर दूर से अपराध करने आया और कार्यस्थल पर हमला किया। संदिग्ध ड्राइवर और सीसीटीवी फुटेज से वह गिरफ्तार हो गया।

Web Title : Horror: Man Kills Mother of Two Over Blocked Social Media Account

Web Summary : In Punjab, a man brutally murdered a mother of two after she blocked him on social media. The accused traveled 231km to commit the crime, attacking her at her workplace. He was arrested thanks to a suspicious driver and CCTV footage.