बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 18:08 IST2026-04-25T18:05:36+5:302026-04-25T18:08:42+5:30
Bhandara Accident: सहा जनावरांची कारमधून तस्करी केली जात असल्याचा प्रकार एका अपघातामुळे उघडकीस आला.

बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
भंडारा : विश्वास बसणार नाही, पण चक्क कारमध्ये ६ जिवंत जनावारांना निर्दयपणे कोंबून तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मध्यरात्रीनंतर या कारचा अपघात झाल्याने हा प्रकार उघड झाला. त्यामधील एका गायीचा मृत्यू झाला.
तुमसर -भंडारा मार्गावर वरठी पोलिसांच्या हद्दीतील बोथली गावाजवळ २४ ते २५ एप्रिलच्या मध्यरात्री हा अपघात घडला. भरधाव जाणार कार (एमएच ०४ / डीबी ८७४९) या गावाजवळ उलटली.
अपघात घडल्याचे पहाटे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्या कारमध्ये ६ जनावरे निर्दयपणे कोंबलेली आढळली. त्यामधील एका गायीचा अपघातामध्ये मृत्यू झाला.
कारमध्ये ६ जिवंत जनावारांना निर्दयपणे कोंबून तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मध्यरात्रीनंतर या कारचा अपघात झाल्याने हा प्रकार उघड झाला. त्यामधील एका गायीचा मृत्यू झाला. तुमसर -भंडारा मार्गावर वरठी पोलिसांच्या हद्दीतील बोथली गावाजवळ २४ ते २५ एप्रिलच्या… pic.twitter.com/mwA4iqWjUZ
— Lokmat (@lokmat) April 25, 2026
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोथली गावाजवळ चालकाचा वाहनावरून ताबा सुटला. त्यामुळे रस्ता सोडून पांजरा रोडकडे जाऊन हे वाहन उलटले. अपघातानंतर कारचालक पळून गेला.
अन् गावकऱ्यांना धक्काच बसला !
पहाटे हा प्रकार लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली असता, वाहनामध्ये माणसांऐवजी चक्क जनावरे कोंबलेली पाहून आश्चर्याचा धक्का बसला. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी सकाळी घटनास्थळी दाखल होऊन गावकऱ्यांच्या मदतीने दोरखंडाने ओढून कार सरळ केली व सर्व जनावरांना बाहेर काढले. त्यातील एक जणांवर घटनास्थळी दगावले.
गोतस्करीला आळा घाला : मागणी
गो-तस्कर वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करीत असल्याने मार्गावर सर्वच वाहनांची कडक तपासणी केली जावी आणि रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.