Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 12:33 IST2026-04-25T12:33:28+5:302026-04-25T12:33:28+5:30
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी अवतारपूजा करायची आहे, असं सांगून भोंदू अशोक खरातने त्याचाच सीए ललित पोफळेच्या मनात भीती घालत तब्बल ८ कोटी ७६ लाखांची फसवणूक केली.

Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
नाशिक - आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी अवतारपूजा करायची आहे, असं सांगून भोंदू अशोक खरातने त्याचाच सीए ललित पोफळेच्या मनात भीती घालत तब्बल ८ कोटी ७६ लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातवर शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
सीए पोफळे यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच एसआयटीकडे खरातबाबत लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर शुक्रवारी प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी पोफळे हे खरातचे एकेकाळचे विश्वासू होते. कुठल्याही ट्रस्टच्या आर्थिक व्यवहाराची माहिती ठेवण्यासाठी सीए आवश्यक असतो. त्यामुळे पोफळे यांना भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवर विश्वस्त म्हणून नेमण्यात आलं होतं.
झोप गेली, डोकंही दुखतंय... आलिशान जीवन जगणाऱ्या भोंदू अशोक खरातचं प्रकृतीविषयी रडगाणं
याचाच फायदा घेत भोंदू खरातने फसवणूक केल्याचा आरोप पोफळे यांनी केला. अनेक प्रकरणात खरातला पोफळे हेच मदत करीत असल्याचा संशय असल्याने ललित पोफळे यांच्या पुणे येथील निवासस्थानी आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली होती. मात्र, आपला या प्रकरणात संबंध नसल्याचे पोकळे यांनी चौकशीत सांगितले होते. त्यानंतर खरातबद्दल पोफळे यांनी आता तक्रार दाखल केली.
अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय
घरावरील संकट टाळण्यासाठी तसेच आईवडिलांना मृत्यूचा योग असून तो टाळण्यासाठी खरातने पोफळे यांच्याकडून २०१८ ते २०२३ दरम्यान पैसे घेतले. मिळालेल्या माहितीनुसार ही पूजा पुण्यात दहा तास चालली होती. त्यात हवाला रॅकेटमधील दुबईचा व्यापारी सहभागी होता. याच पूजेसाठी खरातने पैसे उकळल्याचा संशय असून खरातवर दाखल गुन्ह्याचा तपास आता क्राइम ब्रांचकडे सोपविण्यात आला आहे.
भोंदू खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर, भक्तांची यादी ईडीच्या ताब्यात
"...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
एकूण बारावा गुन्हा दाखल
खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात एकूण १२ गुन्हे दाखल झाले असून त्यात ८ गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे तर चार गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. खरातचे ओकस प्रॉपर्टी हे कार्यालय सरकारवाडा पोलीस हद्दीतच असून येथे बारा तसेच राज्यातील इतर ठिकाणी ७ स्वतंत्र गुन्हे खरातवर दाखल आहेत.