“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 15:40 IST2026-04-25T15:34:01+5:302026-04-25T15:40:47+5:30

Swati Maliwal News: अरविंद केजरीवाल भ्रष्टाचार, गुंडगिरीसाठी ओळखले जातात, तर पंतप्रधान मोदी जगातील सर्वांत लोकप्रिय नेते आहेत, असे स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे.

swati maliwal slams and said arvind kejriwal is anti women and with bjp only because of his trust in pm modi | “अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल

“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल

Swati Maliwal News: आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील १० पैकी ७ खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे आप आमदी पक्षाला खूप मोठा राजकीय धक्का बसला. आप खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह सात जणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर आता स्वाती मालीवाल यांनीही भाजपासोबत असल्याबाबत दुजोरा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर बोचरी टीका केली. 

स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या कथित हल्ल्याच्या घटनेत पक्षाने आपली बाजू न घेतल्याने आणि आरोपीला संरक्षण दिल्याचा आरोप करत पक्षाविरुद्ध भूमिका घेतली होती. सन २००६ मध्ये माझी नोकरी सोडली आणि राष्ट्रसेवेचा मार्ग निवडला. माहिती अधिकार आंदोलन, अण्णा हजारे यांचे आंदोलन, आम आदमी पक्षाची स्थापना आणि दिल्ली महिला आयोग यांसारख्या ८ वर्षांच्या काळात प्रत्येक टप्प्यावर पूर्ण प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने योगदान दिले. आम्हाला अत्यंत दु:खद अंत:करणाने सांगावे लागत आहे की, अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सांगण्यावरून संपूर्ण आम आदमी पार्टी प्रामाणिक राजकारणाच्या त्या तत्त्वे, मूल्ये आणि निर्धारापासून भरकटली आहे, ज्यांच्या आधारे आम्ही हा प्रवास सुरू केला होता, अशी टीका स्वाती मालीवाल यांनी केली. 

विधायक राजकारणासाठी भाजपमाध्ये सहभागी व्हावे

आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपासोबत जाण्याचा निर्णय दबावाखाली नव्हे, तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावरील विश्वासापोटी घेतला. विधायक राजकारणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी भाजपमाध्ये यावे, असे आवाहन मालीवाल यांनी केले. तसेच अरविंद केजरीवाल यांना 'महिला-विरोधी' संबोधत स्वाती मालीवाल म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षांत संसदेत बोलण्याची एकही संधी देण्यात आली नाही, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांनीच घरात एका गुंडाकडून मारहाण करवली. जेव्हा मी आवाज उठवला, तेव्हा मला धमक्या देण्यात आल्या आणि घाबरवण्यात आले. एफआयआर मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्यात आला, असेही त्या म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते

एकीकडे अरविंद केजरीवाल भ्रष्टाचार आणि 'गुंडगिरी'साठी ओळखले जातात, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान शत्रूंच्या घरात घुसून त्यांना अद्दल घडवणे असो, देशातून नक्षलवाद संपवणे असो, किंवा संसदेत महिला आरक्षण विधेयक सादर करणे असो, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाच्या विकासासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. भाजपमध्ये नाइलाजाने नाही, तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर माझा विश्वास असल्यामुळे सहभागी झालो, असे मालीवाल यांनी नमूद केले.

दरम्यान, त्याच्याच सांगण्यावरून त्याच्या निवासस्थानी माझ्यावर निर्घृणपणे हल्ला आणि अत्याचार करण्यात आले. त्यांनी आपल्या हस्तकाचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्याला उच्च पदे देऊन पुरस्कृत केले. त्याने मला संपवण्याची धमकी दिली आणि शक्य ते सर्व प्रयत्न केले. केजरीवाल यांच्या आश्रयाखाली आम आदमी पक्षात बोकाळलेला भ्रष्टाचार, महिलांवरील छळ आणि हल्ल्याच्या घटना, गुंड प्रवृत्तींना मिळणारे प्रोत्साहन आणि पंजाबची फसवणूक व लूट या सर्व बाबी लक्षात घेता, पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असेही स्वाती मालीवाल यांनी म्हटले. 

 

Web Title : मालीवाल: केजरीवाल महिला विरोधी, पीएम मोदी पर विश्वास, भाजपा में शामिल।

Web Summary : स्वाति मालीवाल भाजपा में शामिल हुईं, केजरीवाल पर अविश्वास और मोदी के नेतृत्व में विश्वास जताया। उन्होंने केजरीवाल पर महिला विरोधी होने और हमलावर को बचाने का आरोप लगाया, जिससे उन्होंने आप छोड़ने का फैसला किया।

Web Title : Maliwal: Kejriwal anti-women, trusts PM Modi, joins BJP.

Web Summary : Swati Maliwal joins BJP, citing distrust in Kejriwal and faith in Modi's leadership. She accuses Kejriwal of being anti-women and protecting her attacker, leading to her decision to leave AAP.