देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. योगी यांनी प्रियंका यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख हा 'काँग्रेसची शहजादी' असा केला आहे. ...
यवतमाळ येथील काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये शुक्रवारी दुपारी दोन सभापतींविरूद्ध अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला, तर एका सभापतीविरोधातील प्रस्ताव बारगळला. ...
बाबुश मोन्सेरात यांच्या प्रचारासाठी काँग्रेसी नेत्यांनी पणजीत डेरा टाकला आहे. पक्षाचे विधिमंडळ नेते बाबू कवळेकर तसेच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी घरोघर गाठीभेटी सुरू केल्या आहेत. ...