देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि मध्य प्रदेशमधील मंत्री पीसी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शिवराज चौहान यांची भेट घेतली होती. ...
गेल्या काही दिवसांपासून मोदींच्या नेतृत्वातील सरकारकडून लोकशाहीच्या चारही स्तंभावर हल्ला करण्यात येत आहे. पत्रकारिता क्षेत्र संकटात आहे. त्यामुळे आपण काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे लोजदने स्पष्ट केले. ...
अमेठी येथील मतदानाच्या वेळी स्मृती इराणी यांनी राहुल गांधींकडून बूथ कॅप्चर करण्यात आल्याचा आरोप केला होता. या संदर्भातील व्हिडिओ स्मृती यांनी आपल्या ट्विटर हँडलवर टाकला होता. ...