'Terrorists and Rocky Suits', Modi's Target on Congress | 'दहशतवादी अन् दगडफेक्यांना सूट', मोदींचा काँग्रेसवर निशाणा  
'दहशतवादी अन् दगडफेक्यांना सूट', मोदींचा काँग्रेसवर निशाणा  

चंदीगड - हरयाणाच्या फतेहबाद येथील निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस देशद्रोहाचा कायदा हटविण्याचे सांगत आहे. काँग्रेसला तुकडे-तुकडे गँग हवीय, भारत देशाला शिव्या देणारे, तिरंग्याचा अपमान करणारे, नक्षलवाद्यांचे समर्थन करणारे लोक काँग्रेसला हवेत, असे मोदींनी म्हटले. 

केंद्रात काँग्रेसप्रणित सरकार आल्यास देशद्रोहाचा कायदा रद्द करणार असल्याच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा दलांचा विशेषाधिकारही काढून घेण्याचे काँग्रेसने म्हटलं आहे. तर दगडफेक करणाऱ्यांना आणि दहशतवाद्यांना मुक्त सूट देण्याचं काँग्रेसच धोरण असल्याचंही मोदींनी म्हटले आहे.

काँग्रेसची नितिमत्त स्वच्छ नव्हती, त्यामुळेच मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले नाही. मात्र, मोदी सरकारने प्रयत्न केल्यानंतर आता मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तान आता मसूद अजहरवर निश्चितच कारवाई करेल, असेही मोदींनी म्हटले. तसेच काँग्रेसने माझ्या अनेक नावांनी नामकरण केले आहे. गद्दार, मुसोलोनी यांसह हिटलर अशी नावे मला दिली आहेत. मला शिव्या देताना या नेत्यांनी अनेक 


 
 


Web Title: 'Terrorists and Rocky Suits', Modi's Target on Congress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.