“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 16:56 IST2026-04-23T16:55:08+5:302026-04-23T16:56:43+5:30

BJP Nitin Nabin Uttar Pradesh Assembly Election News: नितीन नवीन यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे.

bjp nitin nabin big statement said cm yogi adityanath is the face of bjp for uttar pradesh assembly elections 2027 | “२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान

“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान

BJP Nitin Nabin Uttar Pradesh Assembly Election News: उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यावरून आतापासूनच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालेली आहे. समाजवादी पक्षाने पश्चिम उत्तर प्रदेशातील दादरी येथून आपल्या 'मिशन २०२७' मोहिमेचा शुभारंभ केला आहे. आता भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपाने २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवार निश्चित केला असून, त्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची योजना आखली आहे. भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात एक मोठे विधान केले आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी स्पष्टपणे सांगितले, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत. सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत, आम्ही निश्चितपणे त्यांनाच आमचा चेहरा म्हणून निवडू. नितीन नवीन यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. भाजपा २०२७ ची विधानसभा निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढेल, असे म्हटले जात आहे. नितीन नवीन यांनी उत्तर प्रदेशात सत्तेची हॅटट्रिक साधण्याची आशा व्यक्त केली आहे.

एक उत्तम राज्य बनवण्याची प्रक्रिया पुढे नेत आहेत

भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले की, मुख्यमंत्री योगी आणि मुख्यमंत्री धामी हे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे चेहरे असतील का. यावर उत्तर देताना नवीन म्हणाले, ते निश्चितपणे चेहरे असतील. तसेच उत्तर प्रदेशच्या मुद्द्यावर बोलताना नवीन म्हणाले की, उत्तर प्रदेश, जो एकेकाळी खंडणी आणि गुन्हेगारीसाठी ओळखला जात होता, तो आता सुधारित कायदा आणि सुव्यवस्था आणि द्रुतगती मार्गांसाठी ओळखला जात आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ज्या प्रकारे उत्तर प्रदेशला एक उत्तम राज्य बनवण्याची प्रक्रिया पुढे नेत आहेत, ते कौतुकास्पद आहे. 

दरम्यान, निःसंशयपणे, सुशासन, विकास आणि पायाभूत सुविधा या लोकांच्या प्राथमिक गरजा आहेत. उत्तर प्रदेश राज्य देशातील आघाडीच्या राज्यांपैकी एक म्हणून कामगिरी करत आहे. सामान्य जनता याच आधारावर मतदान करते. पंतप्रधान अन्न योजनेपासून ते तळागाळापर्यंत सर्व सरकारी योजना राबवून आम्ही गरिबांप्रति आस्था दाखवली आहे. आम्ही पायाभूत सुविधांचा विकास दाखवून दिला आहे. आम्ही उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही आणत आहोत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे वैशिष्ट्य स्पष्टपणे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील अनेक शहरे विकसित झालेली आहेत. त्यामुळे, हॅटट्रिक साधत आपले तिसरे सरकार स्थापन करण्यासाठी हे सर्व पुरेसे आहे, असा विश्वास नवीन यांनी व्यक्त केला. 

 

Web Title : योगी आदित्यनाथ: 2027 यूपी चुनाव में भाजपा का चेहरा, बोले नितिन नवीन।

Web Summary : नितिन नवीन ने योगी आदित्यनाथ को 2027 उत्तर प्रदेश चुनावों के लिए भाजपा का चेहरा घोषित किया। उन्होंने आदित्यनाथ के नेतृत्व में बेहतर कानून व्यवस्था और बुनियादी ढांचे के विकास पर प्रकाश डाला। नवीन ने सुशासन, विकास और गरीब समर्थक पहलों को प्रमुख कारक बताते हुए भाजपा को लगातार तीसरा कार्यकाल मिलने का विश्वास जताया।

Web Title : Yogi Adityanath: BJP's face for 2027 UP elections, says Nitin Nabin.

Web Summary : Nitin Nabin declared Yogi Adityanath as BJP's face for the 2027 Uttar Pradesh elections. He highlighted improved law and order and infrastructure development under Adityanath's leadership. Nabin expressed confidence in BJP securing a third consecutive term, citing good governance, development, and pro-poor initiatives as key factors.