देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मल्का यांनी इस्राईलच्या ७१व्या स्वतंत्र दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले भारत आणि इस्राईल विविध क्षेत्रातील आपले संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ...
काँग्रेसकडून मध्य प्रदेशातील शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पाळले गेले नसल्याचे आरोप गेल्या अनेक दिवसांपासून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान करत आहेत. ...
माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि मध्य प्रदेशमधील मंत्री पीसी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शिवराज चौहान यांची भेट घेतली होती. ...