लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 16:13 IST2026-04-23T16:12:08+5:302026-04-23T16:13:15+5:30

बॉयफ्रेंडसोबत केलं आंतरधर्मीय लग्न, आता १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा

tv actress aamna sharif divorce rumours with husband after 13 years of marriage | लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."

लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."

हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असलेली अभिनेत्री आमना शरीफ तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. आमनाच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आमना शरीफ लग्नानंतर १३ वर्षांनी घटस्फोट घेणार असल्याचंही बोललं जात आहे. नुकतंच आमवा शरीफने एका फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करताना दिसून आली. यावेळी घटस्फोटाबद्दल विचारताच आमना शरीफने प्रतिक्रिया दिली आहे. 

आजतकशी बोलताना आमना म्हणाली, "मी गायब झाले नव्हते. तर मी काही वेळासाठी ब्रेक घेतला होता. पण आता मी परत आले आहे. मला रॅम्प वॉक करायला आवडतं. माझ्यासाठी हे खूप खास आहे. मी रॅम्प वॉक करते तेव्हा माझा नवरा अमित कपूर आणि १० वर्षांचा मुलगा मला प्रोत्साहन देतात. माझ्या मुलाने पहिल्यांदाच मला असं पाहिलं. तो मला स्क्रीनवर पाहत नाही. कारण मी त्याला या सगळ्यापासून दूर ठेवलं आहे". घटस्फोटाबद्दल विचारताच आमनाने थेट उत्तर दिलं नाही. "मला माझं प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्य वेगळं ठेवायला आवडतं. मला ड्रामा आवडत नाही आणि कोणाच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही", असं ती म्हणाली. 


आमनाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. कही तो होगा या मालिकेतून ती घराघरात पोहोचली होती. 'कसौटी जिंदगी की', 'आधा इश्क', 'होंगे जुदा ना हम' अशा मालिकांमध्ये ती दिसली होती. काही बॉलिवूड सिनेमांमध्येही आमना झळकली होती. २०१३ मध्ये तिने बॉयफ्रेंड अमित कपूरसोबत लग्न केलं होतं. त्यांना १० वर्षांचा मुलगा आहे. 

Web Title : आमना शरीफ की शादी 13 साल बाद खतरे में? ड्रामा टाला।

Web Summary : टीवी अभिनेत्री आमना शरीफ की शादी के 13 साल बाद तलाक की अफवाहें। उन्होंने पुष्टि करने से इनकार किया, कहा कि वह अपनी गोपनीयता को महत्व देती हैं और नाटक पसंद नहीं करतीं। उन्होंने अपने करियर के लिए परिवार के समर्थन पर जोर दिया और अपने बेटे को लाइमलाइट से दूर रखा।

Web Title : Aamna Sharif's marriage in trouble after 13 years? Drama avoided.

Web Summary : TV actress Aamna Sharif faces divorce rumors after 13 years of marriage. She avoids confirming, stating she values her privacy and dislikes drama. She emphasizes her family's support for her career while keeping her son away from the spotlight.