देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
दिग्विजय सिंह यांच्यासाठी पुढे सरसावलेले कम्प्युटर बाबा यांच्याविरुद्ध भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी सुदाम खाडे यांनी कम्प्युटर बाबांची भाजपविरुद्ध सुरू असलेल्या हटयोग आणि धुनीची चौकशी सुरू केली आहे. ...
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरुन काँग्रेस-भाजपामध्ये राजकीय वातावरण तापू लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधीवर केलेल्या टीकेनंतर काँग्रेसकडून भाजपाला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. ...
मल्का यांनी इस्राईलच्या ७१व्या स्वतंत्र दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले भारत आणि इस्राईल विविध क्षेत्रातील आपले संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ...
काँग्रेसकडून मध्य प्रदेशातील शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पाळले गेले नसल्याचे आरोप गेल्या अनेक दिवसांपासून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान करत आहेत. ...