देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
उमेदवारी दाखल करतानाच मोदींनी निश्चित केले होते की, आता विजयानंतर वाराणसीत पाय ठेवणार आहे. मात्र १७ मे रोजी प्रचार बंद झाल्यानंतर मोदी वाराणसीत मुक्कामी राहणार आहेत. ...
मनोहर पर्रीकर यांच्या हयातीत एकदा देखील पणजी विधानसभा मतदारसंघात पराभूत न झालेल्या भारतीय जनता पक्षाने यावेळी पणजीतील विजयाची आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत ...
मोदींना सर्कशीतील वाघ म्हटल्याप्रकरणी काँग्रेसकडून मनप्रीत सिंग यांच्यावर कारवाई करण्यात येणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर भाजप याला काय उत्तर देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ...
युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघात मंगळवारी प्रचाराला गेलेल्या आदिती सिंह यांच्यावर हल्ला झाला आहे. जिल्हा पंचायत प्रमुख अवधेश सिंह यांनी हल्ला केल्याचा आरोप आदिती सिंह यांनी केला आहे. ...
भोपाळमधील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह नेहमीच म्हणतात, निवडणुकी मॅनेजमेंटने जिंकल्या जातात. त्यामुळे त्यांच्याकडून काहीही करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रज्ञा सिंह आणि आम्ही येथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आलो आहोत, असंही ...