देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मंगळवारी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना फोन केला होता. मात्र रेड्डी यांनी पवारांचा फोन घेणे टाळल्याचे समजते. ...
देशात एनडीए पुन्हा एकदा सत्तेत परतल्यास मुस्लीम बांधवांनी भाजपशी जुळवून घ्यावे ही नम्रतेचे आवाहन मी करतो, असंही बेग म्हणाले. तसेच गरज भासल्यास मुस्लिमांनी भाजपमध्ये सामील व्हावे, असंही त्यांनी सांगितले. ...
काँग्रेसचे दिल्लीतील काही नेते, आमदार, आम आदमी पक्षाचे आमदार यांच्यावर भाजपाची नजर आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीतील फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येणार आहे. ...