देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि यूपीएला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...
देशात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत सर्वाधिक प्रमाणात जाती-पातीचे राजकारण होत आले आहे. परंतु, या लोकसभा निवडणुकीत जातीची समीकरणे पूर्णपणे विफल ठरल्याचे चित्र आहे. ...
कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा पक्ष मोठाच असतो आणि पक्ष हा देशापेक्षा मोठा असतो, यावर माझा विश्वास आहे. माझं सत्यासोबत असणे मोदी ऍन्ड कंपनीला खटकत होते, असही सिन्हा यांनी सांगितले. ...
भारतीय जनता पक्षाने ३०० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. निकालानंतर दोन तासांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी राहुल यांच्या निवसस्थानी पराभवावर चर्चा केली. ...