Lok Sabha Election 2019 Results : देशभरात मोदीलाट सुसाट; भाजपाची स्वबळावर तीनशेपार मजल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 05:10 PM2019-05-23T17:10:05+5:302019-05-23T17:12:41+5:30

सतराव्या लोकसभेचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे.

Lok Sabha Election 2019 Results: BJP cross 300 seats mark in Lok sabha Result | Lok Sabha Election 2019 Results : देशभरात मोदीलाट सुसाट; भाजपाची स्वबळावर तीनशेपार मजल

Lok Sabha Election 2019 Results : देशभरात मोदीलाट सुसाट; भाजपाची स्वबळावर तीनशेपार मजल

Next

नवी दिल्ली - सतराव्या लोकसभेचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत हाती आलेले कल आणि काही निकालांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने 340 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपानेही स्वबळावर 300 पार मजल मारण्याच्या दिशेने कूच केली आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएची पुन्हा एकदा दाणादाण उडाली असून, काँग्रेस आणि मित्रपक्ष 90 हून अधिक जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर पक्ष 110 जागांवर आघाडीवर आहेत. 

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच भाजपा आणि मित्रपक्षांनी आघाडी घेतली होती. मतमोजणीला सुरुवात होऊन  नऊ तास उलटले असून, भाजपा आणि मित्रपक्षांची आघाडी 340 हून अधिक जागांपर्यंत पोहोचली आहे. दक्षिण भारत वगळता देशातील सर्वच भागातून भाजपा आणि मित्रपक्षांना जोरदार समर्थन मिळाले आहे. 

महाआघाडीने कडवे आव्हान उभे केलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने आपले वर्चस्व राखले असून, उत्तर प्रदेशात 58 हून अधिक जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. बिहारमध्येही भाजपा आणि मित्रपक्ष 36 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाराष्ट्रामध्ये 41 जागांवर शिवसेना भाजपा युती आघाडीवर आहे. 

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे. येथील 42 मदारसंघांपैकी 18 जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर कर्नाटकमध्ये 28 पैकी 24 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपाने पैकीच्या पैकी जागांवर यश मिळले आहे. 

 तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, आसाम या राज्यांमध्येही भाजपाने घवघवीत यश मिळवले आहे. त्याशिवाय तेलंगाणामध्येही ठळक उपस्थिती दर्शवताना भाजपाने पाच जागांवर आघाडी घेतली आहे. 

दरम्यान, काँग्रेस आणि मित्रपक्षांची कामगिरी 2014 च्या तुलनेत सुधारली आहे. मात्र असे असले तरी यूपीएला 100 जागांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. 2014 नंतर काँग्रेसला  पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याइतपत जागा मिळवण्यामध्येही काँग्रेसचा अपयश येण्याची शक्यता आहे.   

Web Title: Lok Sabha Election 2019 Results: BJP cross 300 seats mark in Lok sabha Result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.