लोकसभा निवडणूक २०१९: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी, दिला राजीनाम्याचा प्रस्ताव 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 06:13 PM2019-05-23T18:13:14+5:302019-05-23T19:17:31+5:30

आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि यूपीएला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

today people have clearly given their decision. I congratulate the PM and BJP -Rahul Gandhi | लोकसभा निवडणूक २०१९: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी, दिला राजीनाम्याचा प्रस्ताव 

लोकसभा निवडणूक २०१९: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी, दिला राजीनाम्याचा प्रस्ताव 

googlenewsNext

नवी दिल्ली - आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि यूपीएला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे, दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावी जबाबदारी स्वीकारली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काँग्रेस पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्तावही राहुल गांधी यांनी दिला आहे. 

लोकसबा निवडणुकीच्या निकालांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पराभवाची जबाबदारी स्वीकारली. '' निवडणूक प्रचारादरम्यान, मी जनता मालक आहे, असे म्हटले होते. आता निकालांमध्ये जनतेने आपला कौल स्पष्टपणे दिला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अभिनंदन करतो.'' असे राहुल गांधी म्हटले आहे. 




आमची लढाई ही विचारधारेची लढाई आहे. या निवडणुकीत भाजपाच्या विचारसरणीला भाजपाने कौल दिला आहे. मात्र आम्ही विचारसरणीची लढाई लढू आणि आमच्या विचारसरणील विजय मिळवून देऊ, आमचा प्रेमावर विश्वास आहे आणि प्रेमाचा कधीही पराभव होत नाही, असेही राहुल गांधींनी सांगितले. 




दरम्यान, अमेठी येथे पिछाडीवर पडलेल्या राहुल गांधी यांनी स्मृती इराणींना शुभेच्छा दिल्या आहेत.  



 

Web Title: today people have clearly given their decision. I congratulate the PM and BJP -Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.