देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
लोकसभा निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता शहर काँग्रेसने नव्याने विधानसभेच्या तयारीसाठी कंबर कसण्याची तयारी चालविली आहे. विधानसभेसाठी कार्यकर्त्याना बूस्ट देण्यासाठी संकल्प मेळावा आयोजित करून काँग्रेसजन विजयाचा संकल्प करणार आहेत. ...
मागील काही दिवसांत सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत टीका कऱण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायद्यांची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. ...
झारखंडमध्ये मॉब लिंचिगचं प्रकरण झालं. युवकाची हत्या करण्यात आली. हे दुख:दायक आहे. दोषींना कठोर शासन होईल. मात्र अशा घटनांसाठी एका राज्याला जबाबदार धरणे कितपत योग्य आहे? ...
विरोधक आरोप करतात की देश हरला आहे. लोकशाही हरली आहे. मग वायनाड आणि रायबरेली देश हरला का? अमेठीमध्ये भारत हरला का? काँग्रेसचा पराभव झाला म्हणजे देश हरला हा कोणता तर्क आहे ...