देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी तसेच फलक फडकावून सरकारचा निषेध नोंदविला. त्यानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना मागणीचे निवेदन सादर केले. ...
भाजपा- शिवसेनेकडून युतीची तोडण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ...
आधी काँग्रेसचे आणि आता भाजपमधून आमदार झालेले जयकुमार गोरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. किंबहुना भाजपला गळती लागणार असं चित्र तयार होत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी देखील अशाच प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. एकू ...
महाशिवआघाडीत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. त्यामुळे शिवसेनेला देखील काही मुद्दांवर माघार घ्यावी लागणार असं चित्र आहे. आता या मसुद्यातील कोणकोणत्या मुद्दावर शिवसेना नरमाईची भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...
2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात मुस्लीमांसाठी पाच टक्के आरक्षण देऊ केले होते. परंतु, युतीचे सरकार आल्यानंतर हे आरक्षण कायम राहू शकले नाही. आता युतीचे सरकार येणार नाही स्पष्ट झाल्यानंतर मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चे ...