देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राज्यातील या स्थितीबाबत सर्वसामान्य मतदारांना काय वाटते? या राजकीय पेचाला नेमके कोण जबाबदार असल्याची जनभावना आहे? राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास मतदार त्याकडे कोणत्या नजरेने पाहतात? या व अशा काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा केलेला प्रयत्न. ...
शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय दिल्लीत होईपर्यंत, त्या पक्षाच्या नेत्यांसह राज्यपालांना भेटायला जाणे योग्य होणार नाही, अशा सूचना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्यामुळे शनिवारी राज्यपालांची भेट रद्द करावी लागली. ...
मतदारांनी स्पष्ट कौल दिला असताना राष्ट्रपती राजवट लागू झाली. पुरोगामी महाराष्ट्राचे यामुळे धिंडवडे निघाले असून याला सर्वस्वी सेना-भाजपचे नेतेच कारणीभूत आहेत. ...