राष्ट्रवादीची उद्या महत्त्वाची बैठक; शरद पवार-सोनिया गांधींची भेट रद्द! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 09:58 PM2019-11-16T21:58:42+5:302019-11-16T22:05:23+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगाने हालचाली सुरू

NCP's Sharad Pawar-Sonia Gandhi Meet On Maharashtra postponed | राष्ट्रवादीची उद्या महत्त्वाची बैठक; शरद पवार-सोनिया गांधींची भेट रद्द! 

राष्ट्रवादीची उद्या महत्त्वाची बैठक; शरद पवार-सोनिया गांधींची भेट रद्द! 

Next

पुणे : पुण्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. 

दरम्यान, राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर उद्या म्हणजेच १७ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट होणार होती. मात्र, ही भेट रद्द झाल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगाने हालचाली सुरू झाल्या असून उद्याच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सरकार स्थापन करण्याबद्दल बैठका पार पडल्या. या तीनही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी एका बैठकीत सत्ता स्थापनेबाबत किमान समान कार्यक्रमाचा अहवाल तयार केला असून हा अहवाल पक्षाच्या प्रमुखांना दिला आहे. 

मात्र, अद्याप यावर अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या उद्याच्या भेटीला अत्यंत महत्त्व होते. पण, ही भेट रद्द झाल्यामुळे राज्यातील सत्ताकोंडी आणखीच वाढणार की काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

Web Title: NCP's Sharad Pawar-Sonia Gandhi Meet On Maharashtra postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.