देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Madhya pradesh political crisis सिंधियांच्या गटातील 19 काँग्रेस आमदारांनी राजीनामे पाठविले असून या आमदारांना बेंगळुरुतील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. ...
Madhya pradesh political crisis गेल्या 15 वर्षांपासूनचे भाजपाचे सरकार उलथवून काँग्रेसने काठावर बहुमत मिळवत मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली होती. मात्र, कमलनाथ यांचे सरकार अल्पायुषी ठरताना दिसत आहे. ...
Jyotiraditya Scindia यांच्यावर काँग्रेसने पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवत हकालपट्टीची कारवाई केली आहे. हा निर्णय पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी य़ांनी घेतला असून राहुल गांधींनी प्रक्रियेत सहभाग घेतला की नाही याबाबत काहीही माहिती नाही. ...
काँग्रेसच्या नेतृत्वावर शिंदे नाराज आहेत. ते जर भाजपात आले तर गमावलेले मोठे राज्य पुन्हा भाजपाच्या ताब्यात येईल, असे अमित शाहा यांना सांगण्यात आले. ...
जगभरात थैमान घालत असलेल्या कोराना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिजेलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या घडामोडींचा धागा पकडून राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे ...