ज्योतिरादित्य शिंदेंना गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधींना भेटायचे होते, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:18 AM2020-03-11T11:18:43+5:302020-03-11T13:43:18+5:30

Jyotiraditya Scindia यांच्यावर काँग्रेसने पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवत हकालपट्टीची कारवाई केली आहे. हा निर्णय पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी य़ांनी घेतला असून राहुल गांधींनी प्रक्रियेत सहभाग घेतला की नाही याबाबत काहीही माहिती नाही.

Jyotiraditya Shinde wanted to meet Rahul Gandhi from few months, but ...hrb | ज्योतिरादित्य शिंदेंना गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधींना भेटायचे होते, पण...

ज्योतिरादित्य शिंदेंना गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधींना भेटायचे होते, पण...

googlenewsNext

नवी दिल्ली : मंगळवारी होळीचा दिवस कोरोनाच्या सावटाखाली असला तरीही ज्योतिरादित्या शिंदेंच्या काँग्रेस सोडण्याने गाजला. शिंदेनी राजीनामा ट्विटरवर पोस्ट करताच काँग्रेसने त्यांच्यावर गद्दारीच्या आरोप लावत हकालपट्टीची कारवाई केली. मात्र, आता वेगळाच खुलासा येत आहे. ज्योतिरादित्य शिंदेनाराहुल गांधींकडूनच सापेक्षपणाची वागणूक मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. 


त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आणि शिंदे परिवाराचे जवळचे प्रद्योत माणिक्य देववर्मा यांनी दावा केला आहे की, ज्योतिरादित्य शिंदे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून राहुल गांधी यांची भेट मागितलेली. मात्र, त्यांना भेटण्याची संधीच दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 


प्रद्योत माणिक्य देववर्मा यांनी एका टीव्ही चॅनेलला चर्चा करताना खुलासा केला आहे. ज्योतिरादित्य शिंदे काही महिन्यांपासून राहुल गांधी यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना भेटण्याची संधीच देण्यात आली नाही. जर आमचे ऐकायचेच नसेल तर आम्हाला पक्षात तरी का घेण्यात आले, असा सवालही त्यांनी राहुल यांचे नाव घेऊन उपस्थित केला. 


प्रद्योत माणिक्य देववर्मा यांनी फेसबुक पोस्ट लिहीली आहे. यामध्ये दावा केला आहे की, मी रात्री उशिरा शिंदे यांच्याशी बोललो. त्यांनी मला सांगितले की खूप वाट पाहिली, मात्र वरिष्ठ नेत्यांकडून कोणतीही वेळ दिली गेली नाही. काँग्रेस पक्षाकडे पाहून मला दुख: होतेय, कारण पुढील दशकभरात त्यांच्याकडे एकही तरुण नेता उरणार नाही. 

'बंडखोरी'ला मोठा इतिहास; ज्योतिरादित्यांच्या आजीनेही काँग्रेस सरकार पाडलेले

राजीनामा नाही, काँग्रेसने हकालपट्टी केली; ज्योतिरादित्यांवर ठेवला गंभीर आरोप

...म्हणून आजचा दिवस ज्योतिरादित्य सिंधियांसाठी खास; लवकरच धरणार भाजपचा 'हात'

आणीबाणीने कुटुंब फोडलेले, ज्योतिरादित्य सिंधिया आज जोडणार; राजमातेचे स्वप्न पूर्ण करणार

Web Title: Jyotiraditya Shinde wanted to meet Rahul Gandhi from few months, but ...hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.