Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Anjali Krishna, Ajit Pawar Clash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला खडसावल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. अवैध उत्खननाविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कारवाई थांबवण्याचे आदेश अजित पवारांनी दिले होते. ...
Kailas Patil News: छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आयपीएस अंजना कृष्णा यांच्या प्रमाणपत्रांवर उपस्थित केलेले प्रश्न मागे घेतले असून आता त्यांनी माफी मागितली. ...