तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख ही खड्ड्यांचे शहर म्हणून झाली आहे. यासंदर्भातील विदारक चित्र ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’च्या माध्यमातून लोकमतने समोर आणल्यानंतर पालिका प्रशासनाने याची दखल घेतली आहे. ...
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील पाच नगरपालिका, सात महापालिका आणि १८ तालुक्यांतील ७५ प्राथमिक शाळांचा पटसंख्या खोटी दाखवून शासन सवलती मिळवण्यात समावेश असून माध्यमिक शाळांचा विचार करता कारवाईस पात्र शाळांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. ...
ठाण्यात आरक्षणासाठी २५ जुलै रोजी झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेक मराठा तरुणांची धरपकड करून अनेकांना अटक केली. काहींना संशयावरून घरातून उचलून नाहक मारहाण केली जात आहे. ...
दोन वर्षांपूर्वी शहापूरातील भारत धापटे यांचे अपहरण करुन त्यांचा खून झाला होता. कोणताही धागादोरा नसतांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी यातील दोन आरोपींना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार बाबू भगत शिवसेनेचा पदाधिकारी असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. ...
आंदोलनातील अनेक संशयितांना नाहक अडकवण्यात येत आहे. यामध्ये डॉक्टर, वकील, अभियंता यांचाही समावेश आहे. सनील राजिवडे (२३) या ठाण्याच्या चंदनवाडीतील तरुणाला चौकशीसाठी बोलावून नौपाडा पोलिसांनी बेदम मारहाण केली असून याप्रकरणी पोलिसांची चौकशी करून त्यांच्या ...
परमवीर सिंग यांची अपर महासंचालक कायदा सुव्यवस्था म्हणून महासंचालक कार्यालयात बदली झाली असून ठाण्याच्या आयुक्तपदी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक विवेक फणसाळकर यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. ...