बदलापूरचे दिवसाचे पाणी ठाण्यात वाया; रोज ४० एमएलडी पाणीगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 03:08 AM2018-07-31T03:08:52+5:302018-07-31T03:09:00+5:30

ठाणे शहरात दररोज बदलापूरवासियांची तहान भागवण्यासाठी लागणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त पाणी वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

 Badlapur day water wasted in Thane; Every day 40 MLD water charges | बदलापूरचे दिवसाचे पाणी ठाण्यात वाया; रोज ४० एमएलडी पाणीगळती

बदलापूरचे दिवसाचे पाणी ठाण्यात वाया; रोज ४० एमएलडी पाणीगळती

Next

- अजित मांडके

ठाणे : ठाणे शहरात दररोज बदलापूरवासियांची तहान भागवण्यासाठी लागणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त पाणी वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
उन्हाळा सुरू झाला की, जिल्ह्यासह ठाणे शहराला पाणीकपातीचा सामना करावा लागतो. परंतु, लोकसंख्येचा विचार करून ठाणे शहराला जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत जास्त पाणीपुरवठा होतो. असे असतानाही शहरातील अनेक भागांना आजही पाण्यासाठी झगडावे लागते. मुबलक पाणी असताना केवळ नियोजनाच्या अभावामुळे महापालिकेकडून प्रतिदिन ४९ दशलक्ष लीटर पाण्याची नासाडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही नासाडी बदलापूरला रोज लागणाºया ४० एमएलडीपेक्षाही नऊ एमएलडीने जास्त आहे.
शहराची आजची लोकसंख्या २४ लाखांच्या घरात असून तिला ४३६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची गरज असताना त्यापेक्षा जास्त म्हणजे ४८५ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे. असे असतानाही सोमवारी ठाण्याच्या मध्यवर्ती भागातील शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या कार्यालयावर पाणीटंचाईची तक्रार करीत महिलांचा मोर्चा आला होता. केवळ याच भागात नाही तर शहरातील इतर भागांतही अनेक वेळा कमी दाबाने किंवा एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.

अशी होत आहे नासाडी : ठाणे महापालिकेला एमआयडीसी, स्टेम, मुंबई महापालिका आणि स्वत:च्या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहरात पाणीपुरवठा करणाºया अनेक जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून जमिनीखाली मोठी पाणीगळती होत आहे. काही ठिकाणी मीटरच्या माध्यमातून बिलांचे वाटप होत आहे, तर काही ठिकाणी ती ठोक दिली जात आहेत. त्यामुळे पाणी वापराचा योग्य अंदाज बांधणे शक्य नसल्यामुळे सर्वत्र पाणी टंचाई जाणवत आहे.

गरजेपेक्षा जास्त पाणीपुरवठा
सेंट्रल पब्लिक हेल्थ अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट इंजिनीअरिंग आॅर्गनायझेशनच्या मानांकनानुसार प्रत्येक व्यक्तीची दैनंदिन पाण्याची गरज १५० लीटर इतकी आहे. ठाण्याची सध्याची लोकसंख्या अंदाजे २४ लाख २१ हजार इतकी असून तिची पाण्याची गरज ४३६ एमएलडी आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त पाणीपुरवठा होत असूनही अनेक ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे. २०१५ व २०१६ साली ठाणे शहराला रोज ४८० एमएलडी पाणीपुरवठा होत होता. त्यावर्षी अनुक्र मे पाण्याची गरज ही ४०६ आणि ४२१ एमएलडी इतकी होती. तर, २०१५ साली २१ लाख ७२ हजार लोकसंख्येसाठी ३९० एमएलडी पाण्याची गरज असताना ४६० एमएलडी पाणीपुरवठा होत होता, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

Web Title:  Badlapur day water wasted in Thane; Every day 40 MLD water charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे