जागतिक वारसास्थळ तसेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता असलेल्या कास पुष्प पठारावरील रंगीबेरंगी फुलांचा हंगाम दरवर्षी साधारण सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी पर्यटनासाठी खुला होत असतो. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने सर्वत्र पर्यटनस्थळं बंद आहेत. ...
सुमारे पंधरा वर्षांचा बोलता न येणारा मुलगा बेवारस फिरत होता. संबंधित मुलाची विचारपूस करून राहुल शेडगे यांनी त्याला सातारा येथील बालकल्याणात विभागात दाखल केले. त्यामुळे संबंधित मुलाच्या आयुष्याला दिशा मिळाली. ...
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा वाढतच असून, सोमवारी आणखी १५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे बळींचा आकडा आता ३९७ वर पोहचला आहे. तसेच रविवारी रात्री ४८९ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. ...
महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. पण तो आता सातासमुद्रापारही पोहोचला आहे. जावळी तालुक्यातील केळघरमधील गाडवे कुुटुंबांनी लंडनमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली. यामुळे लंडनमध्येही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करण्यात आला. गाडवे कुटुंबिय दहा ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमीच असून रविवारी कोयनेला २५, नवजा येथे ४९ आणि महाबळेश्वरला ६५ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०० टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. टक्केवारी ९५.४८ झाली असून धरण भरण्याकडे वाटचाल करु लागले आहे. ...
प्रशासनाने म्हसवड शहरातील खासगी दवाखाने अधिग्रहन करुनही तेथे कोरोना बाधितांना दाखल करुन घेत नाहीत. प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करून नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्यायात, या मागण्यासाठी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी शनिवारी सकाळी अचा ...
सातारा जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा कोरोनाच्या विषयावरुन चांगलीच गाजली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांना बेड मिळत नाहीत, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेटिंग करावे लागते, असा मुद्दाही यावेळी सदस्यांनी समोर आणला. ...
राज्यात दारूची दुकाने सुरू केली. मॉल उघडे केले; मात्र राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. देशातील सगळ्या राज्यांनी ती उघडी केली आहेत, अशा परिस्थितीत मंदिरे उघडण्यासंदर्भातील आग्रह योग्य असून, सरकारने तत्काळ ती उघडी करण्यास परवानगी द्यायला पाह ...