सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 07:51 IST2026-05-07T07:50:18+5:302026-05-07T07:51:08+5:30

Suvendu Adhikari PA  Chandranath Rath Murder: भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या करण्यात आल्याने पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली.

BJP Leader Suvendu Adhikari PA  Chandranath Rath Shot Dead In West Bengal | सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!

सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात हिंसक वळण पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली.पोलिसांनी घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, यामागे नेमका कोणाचा हात आहे? याचाही तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील एका प्रत्यक्षदर्शीने समोर येऊन घटनेचा थरार मांडला आहे.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, "ही घटना रात्री १०:३० ते ११:०० च्या दरम्यान मध्यग्रामजवळ घडली. चंद्रनाथ रथ यांची कार अचानक रस्त्याने पुढे जात असताना अचानक थांबली. त्याच वेळी मोटारसायकलवरून आलेल्या एका अज्ञात हल्लेखोराने कारच्या डाव्या बाजूने त्यांच्यावर गोळीबार केला.हल्लेखोर एखाद्या नेमबाजासारखा बंदूक चालवत होता. त्याने चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि काही क्षणातच तो तेथून पसार झाला."

कारचा चालकही जखमी

हा गोळीबार एका रुग्णालयापासून अवघ्या २०० ते ३०० मीटर अंतरावर झाला. गोळीबाराचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चंद्रनाथ रथ यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात कारचा चालकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

ही पूर्वनियोजित हत्याच: सुवेंदू अधिकारी आक्रमक

आपल्या सहकाऱ्याच्या हत्येनंतर सुवेंदू अधिकारी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "ही एक पूर्वनियोजित राजकीय हत्या आहे. गेल्या २-३ दिवसांपासून चंद्रनाथ यांची 'रेकी' (पाळत) केली जात होती आणि त्यानंतरच हा कट अंमलात आणण्यात आला," असा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही (DGP) प्राथमिक दृष्ट्या ही हत्या नियोजित कट असल्याचे मान्य केले आहे.

राजकीय वातावरण तापले

या घटनेनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले असून पोलीस प्रशासनाशी चर्चा केली आहे. भाजपचे अनेक आमदार आणि नेते घटनास्थळी दाखल झाले असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

Web Title : सुवेंदु अधिकारी के पीए की हत्या: प्रत्यक्षदर्शी ने सुनाई हमले की भयावह कहानी

Web Summary : पश्चिम बंगाल में सुवेंदु अधिकारी के पीए चंद्रनाथ रथ की गोली मारकर हत्या कर दी गई। एक प्रत्यक्षदर्शी ने मोटरसाइकिल सवार हमलावर द्वारा रथ की कार पर की गई फायरिंग का वर्णन किया। अधिकारी ने इसे एक सुनियोजित राजनीतिक हत्या बताया है। पुलिस मामले की जांच कर रही है, जिससे राजनीतिक तनाव बढ़ गया है।

Web Title : Suvendu Adhikari's PA Murdered: Eyewitness Recounts Horrifying Attack Details

Web Summary : Suvendu Adhikari's PA, Chandranath Rath, was shot dead in West Bengal. An eyewitness described a motorcycle-borne assailant opening fire on Rath's car at close range. Adhikari alleges a planned political assassination. Police are investigating the incident, which has heightened political tensions.