कुपवाड शहरातील आस्की बेकरी आणि अर्जुन मोबाईल शॉपी फोडणारा अट्टल चोरटा प्रवीण प्रल्हाद भोसले (वय ३१, रा. हनुमाननगर, कुपवाड, मूळ गाव : कुंभोज, जि. कोल्हापूर) यास शनिवारी पहाटे कुपवाड पोलिसांनी अटक केली. ...
वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील सव्वातीन कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी अटकेतील निलंबित पोलिस विश्वनाथ घनवट, हवालदार दीपक पाटील यांची उत्पन्नापेक्षा जादा मालमत्ता असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच ...
केंद्र आणि राज्यस्तरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतचा निर्णय होईल. जिल्हास्तरावरही आघाडी शक्य आहे. सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत सांगलीतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यां ...
गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्र आणि कर्नाटकात गुन्हेगारांनी कारवायांनी दहशत निर्माण केलेल्या विजापूर जिल्ह्यातील चडचण टोळी व पोलिस यांच्यात जोरदार गोळीबाराची चकमक झाली. कोकणगाव (ता. चडचण) येथे सोमवारी सकाळी ही थरारक घटना घडली. चकमकीवेळी झालेल्या ...
मिरज : उसाला पहिला हप्ता साडेतीन हजार रुपये व अंतिम दर साडेचार हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने वड्डी (ता. मिरज) येथे ऊसतोड रोखली.मिरज तालुक्यातील वड्डी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव कोरे व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ...
नेर्ले (ता. वाळवा) येथे राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळेस जबर मारहाण करीत लूटमार केल्या प्रकरणीच्या गुन्ह्यात येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी दोघा आरोपींना ३ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येक ...
मिरज-सांगली रस्त्यावर प्रवास करताना महिलेचे हरविलेले सात तोळे सोन्याचे दागिने गांधी चौक पोलिसांनी शोध घेऊन झोपडपट्टीतून हस्तगत केले. एका आठवड्यात दागिन्यांचा शोध घेऊन छाया संभाजी चव्हाण (रा. सांगली) या महिलेस ते परत देण्यात आले. ...
सांगली येथील आमराईजवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन मोटारींची काच फोडून चोरट्यांनी सात हजाराची रोकड, पॅनकार्ड व लॅपटॉप लंपास केला. शुक्रवारी भरदिवसा दोन वाजता ही घटना घडली. घटनेची रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात नोंद नव्हती. ...