२०२६ च्या स्टायलिश ब्लाऊज डिझाईन्स; १५ पेक्षा जास्त स्लिव्हजचे पॅटर्न्स, ब्लाऊज उठून दिसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:05 IST2026-04-21T11:44:19+5:302026-04-21T12:05:56+5:30

Stylish Blouse Designs of 2026 : बाह्यांच्या मधोमध किंवा काठावर साडीच्या रंगाची लहान पोटली बटन्स लावून त्याला रॉयल लूक दिला जातो.

2026 मध्ये ब्लाऊजच्या बऱ्याचश्या ट्रेंडींग डिझाईन्स व्हायरल होताना दिसून येत आहेत. त्यातले काही सिलेक्टीव्ह, युनिक डिझाईन्स पाहूया. (Stylish Blouse Designs of 2026)

साध्या कोपरापर्यंत लांबी असलेल्या फुग्याच्या बाह्या प्रचंड फॅशनमध्ये आहेत. कोपरापर्यंत बाह्या ठेवून त्यावर काठांना नाजूक कटवर्क करणं लोकप्रिय आहेत. (Latest Blouse Sleeves Designs)

बाह्यांच्या मधोमध किंवा काठावर साडीच्या रंगाची लहान पोटली बटन्स लावून त्याला रॉयल लूक दिला जातो.

बाह्यांसाठी पारदर्शक नेट वापरून त्यावर वेलबुटी किंवा मण्याचे काम सध्या ट्रेंडींग आहे.

बाह्यांच्या टोकाला गोलाकार किंवा त्रिकोणी पद्धतीचे कट दिले जातात. अशी फॅशन सध्या व्हायरल होत आहे.

खांद्यापासून मनगटापर्यंत सैल आणि मनगटावर घट्ट बॉर्डर असलेल्या बाह्या खूपच क्लासी दिसतात.

बाह्यांच्या कडेला रेशमी धाग्यांचे लटकन किंवा मणी लावून त्याला ट्रेंडी बनवले जाते.

खांद्याजवळ कट देऊन तिथे साडीच्या काठाचा वापर करणं अजूनही पसंतीस उतरत आहे.

हाताच्या पंजाकडे रुंद होत जाणाऱ्या बाह्या इंडो वेस्टर्न साड्यांवर उठून दिसतात.

जर तुम्ही बोट नेकचं ब्लाऊज शिवत असाल तर अशा पॅटर्नचे हात शिवू शकता.