रोज वापरण्यासाठी लाईटवेट मंगळसुत्रांचे १० ट्रेंडी पॅटर्न्स; कमी ग्रॅममधल्या सुंदर डिझाईन्स, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:50 IST2026-05-04T10:39:49+5:302026-05-04T12:50:23+5:30

Short Gold Mangalsutra Designs : रोजच्या वापरासाठी बनवलेली असल्यामुळे घाम किंवा पाण्यामुळे ती लवकर खराब होत नाहीत.

रोज घरात वापरण्यासाठी किंवा ऑफिसला घालून जाण्यासाठी सोन्याची लाईटवेट मंगळसूत्र हा उत्तम पर्याय आहे. (Short Gold Mangalsutra Designs)

ही मंगळसूत्र वजनानं अतिशय हलकी असतात ज्यामुळे ती दिवसभर गळ्यात असली तरी त्रास होत नाही. (Light Weight Gold Mangalsutra For Daily Use)

यामध्ये प्रामुख्यानं डेली वेअरसाठी साखळीसारखी किंवा बारीक काळ्या मण्यांची नाजूक डिझाईन उपलब्ध असते.

अशा मंगळसुत्रांना मोठी जड पेंडंटस नसून अतिशय लहान, सोन्याची पानं किंवा हॉर्ट शेपचे पेंडंटंस असतात.

वजनानं हलकी असली तरी रोजच्या वापरासाठी ही मंगळसूत्र पुरेशी मजबूत आणि टिकाऊ असतात.

ही मंगळसूत्र ऑफिसवेअर, कुर्ती किंवा वेस्टर्न कपड्यांवरही उठून दिसतात आणि एक मॉडर्न लूक देतात.

सोन्याचे प्रमाण कमी असल्यामुळे ही मंगळसूत्र सर्व सामान्यांच्या बजेटमध्ये सहज बसतात.

रोजच्या वापरासाठी बनवलेली असल्यामुळे घाम किंवा पाण्यामुळे ती लवकर खराब होत नाहीत.

५ ते ७ ग्रॅममध्ये तुम्हाला सुंदर मंगळसूत्र मिळेल. आजकाल गळ्यालगत राहणारी शॉर्ट लेंथची मंगळसूत्र तरूणींमध्ये आणि नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये खूपच लोकप्रिय होत आहेत.

यात सुरक्षिततेसाठी दर्जेदार हुक किंवा सोन्याचे पेच दिलेले असतात जेणेकरून ती तुटण्याची भिती कमी असते.