नशिबाला दोष देण्यापेक्षा ५ सवयी बदला! व्हाल कायम यशस्वी - शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी हवी खरी ताकद...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2026 19:05 IST2026-05-04T19:00:20+5:302026-05-04T19:05:02+5:30
habits of highly successful people : successful people habits and mindset : signs of a successful person : 'या' ५ सवयी तुम्हाला बनवू शकतात कायम यशस्वी! यशाचं गणित होईल सोपं...

habits of highly successful people
प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं, पण यश मिळवण्यासाठी नेमकं काय करावं हे अनेकांना समजत नाही. काहीजण प्रचंड मेहनत करूनही अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत, तर काहीजण कमी साधनांतही मोठी कामगिरी करतात. यामागचं खरं कारण म्हणजे केवळ नशीब किंवा परिस्थिती नसून, व्यक्तीमध्ये असलेले काही खास गुण आणि सवयी.

successful people habits and mindset
यशस्वी लोकांमध्ये काही समान गुण आढळतात—जसे की शिस्त, सातत्य, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता. हे गुण अंगीकारले, तर कोणतीही व्यक्ती आपल्या ध्येयाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करू शकते. यश हा एक दिवसात मिळणारा परिणाम नसून, तो रोजच्या छोट्या कृती आणि सवयींचा एकत्रित परिणाम असतो.

signs of a successful person
प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या प्रवासाची सुरुवात एका मोठ्या स्वप्नाने होते, पण त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याचे काम त्यांच्या 'सवयी' करतात. आपण दिवसभर काय करतो आणि आपला वेळ कसा खर्च करतो, यावरच आपले भविष्य अवलंबून असते. यशस्वी लोक केवळ नशिबामुळे मोठे होत नाहीत, तर त्यांच्याकडे शिस्त आणि नियोजनाचा एक विशेष 'सक्सेस मंत्र' असतो. जर तुम्हालाही आयुष्यात कायम यशस्वी व्हायचं असेल, तर काही महत्त्वाचे गुण स्वतःमध्ये विकसित करणं गरजेचं आहे. यशाचा हा मार्ग नेमका कसा असतो आणि कोणत्या सवयी आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचवतात ते पाहूयात.

habits of highly successful people you should follow
असे कोणते गुण आहेत जे तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवू शकतात पाहा...

१. उत्तम नियोजन करतात (They Plan Well) :-
यशस्वी लोक त्यांच्या दिवसाचे आणि महिन्यांचे उत्तम नियोजन करतात. याशिवाय, त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची कामे कोणती आहेत हे ते निश्चित करतात आणि त्यानुसार आपला वेळ ठरवतात. असे लोक कामासोबतच आयुष्यातील इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी, जसे की व्यायाम, कुटुंब आणि समाजासाठी देखील वेळ काढतात. कारण उत्तम कामगिरी करण्यासाठी काम आणि विश्रांती या दोन्ही गोष्टी तितक्याच आवश्यक आहेत.

२. ध्येय निश्चित करतात (They Have Goals) :-
यशस्वी लोक हवेत तीर मारत नाहीत, तर ते स्वतःसाठी स्पष्ट ध्येय निश्चित करतात आणि ती साध्य करण्यासाठी सातत्याने मेहनत करतात. यशस्वी लोक एका वेळी एकाच मोठ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात आणि त्यावरच पूर्ण 'फोकस' ठेवतात. यामुळे त्यांना योग्य दिशेने प्रगती करण्यास मदत होते. कारण जेव्हा ध्येय निश्चित असते, तेव्हा नक्की कुठे पोहोचायचे आहे हे देखील स्पष्ट होते.

३. 'टू-डू लिस्ट' बनवतात आणि कामाचा प्राधान्यक्रम ठरवतात (To-Do List & Prioritize) :-
यशस्वी लोक त्यांच्या सर्व कामांची एक यादी (List) तयार करतात, ज्यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो. असे लोक या यादीतील सर्वात महत्त्वाची कामे आधी निवडतात आणि त्यांना प्राधान्य देतात. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे १० कामे असतील, तर त्यातील सर्वात महत्त्वाची २ कामे आधी पूर्ण करा. कोणत्याही परिस्थितीत ही तीच कामे असायला हवीत जी तुम्हाला तुमच्या मोठ्या ध्येयाकडे घेऊन जातील. थोडेसे नियोजन आणि कामाची योग्य विभागणी केल्यामुळे तुमचे काम सोपे होते आणि कामात कोणतीही अडचण येत नाही.

४. मॉर्निंग रुटीन सेट करतात (Morning Routine) :-
यशस्वी लोकांचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे मॉर्निंग रुटीन ठरलेले असते. प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते, परंतु ते त्याचे नियमितपणे पालन करतात. असे लोक आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतात, म्हणूनच ते दिवसाची सुरुवात व्यायाम आणि योग्य आहारानं करतात. आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते, याचा परिणाम आपल्या संपूर्ण दिवसावर होत असतो. त्यांच्या सकाळच्या डेली रुटीनमध्ये वाचन, ध्यान, व्यायाम किंवा प्रार्थना यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो.

५. यशस्वी लोक 'या' सवयींचे करतात पालन :-
यशस्वी लोक त्यांच्या अनुभवातून शिकण्यासाठी त्यावर विचार आणि विश्लेषण करतात; जेणेकरून काय बरोबर झाले आणि काय चूक, हे त्यांना समजू शकेल. तसेच, ते इतरांकडून फीडबॅक घेऊन स्वतःला अधिक चांगले बनवतात. इतकेच नाही तर, ते केवळ स्वतःचा विचार न करता इतरांना मदत देखील करतात. त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असतो आणि ते नकारात्मक विचारांना दूर ठेवून कृतज्ञता व चांगल्या विचारांवर लक्ष केंद्रित करतात. रोजच्या छोट्या-छोट्या चांगल्या सवयींची यादी करून ते त्यांचे नियमित पालन करतात.
















