Gold Ring: १ ग्रॅम सोन्यात डेलिकेट अंगठ्या; १० रेखीव डिजाईन्स, सोन्याचा दागिना करण्याची करा हौस पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 00:15 IST2026-02-02T16:28:04+5:302026-02-03T00:15:37+5:30

Latest Gold Ring Designs For Women, Gold Rate Dropping Gold Jewellery: १ ग्रॅमच्या अंगठ्या बजेटमध्ये बसणाऱ्या आणि दिसायला अत्यंत, नाजूक आणि आकर्षक असतात.

सोन्याचे भाव गगनाला भिडत असताना सध्या दोन ते तीन दिवसांपासून सोन्याच्या दरांत होणारी घट (Gold Rate Dropping) म्हणजे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. (Gold Ring Designs For Women)

१ ग्रॅमच्या अंगठ्या बजेटमध्ये बसणाऱ्या आणि दिसायला अत्यंत, नाजूक आणि आकर्षक असतात. (Latest 10 Gold Ring Designs in One Gram)

या अंगठ्या वजनानं हलक्या असल्यामुळे त्या रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिसला घालून जाण्यासाठी सोयीस्कर ठरतात.

सध्या बाजारात १ ग्रॅममध्ये डिझायनर, फ्लोरल आणि मिनिमलिस्टिक अशा अनेक ट्रेंडी डिझाईन्स उपलब्ध आहेत.

वाढदिवस, एनिव्हर्सरी किंवा इतर कोणत्याही खास प्रसंगांना कोणाला भेट देण्यासाठी ही एक प्रीमियम आणि कायमस्वरूपी आठवणीत राहणारा पर्याय आहे.

दिसायला मोठी पण वजनानं कमी दिसावी यासाठी या अंगठ्या सहसा आतून पोकळ पद्धतीनं बनवल्या जातात.

खरेदी करताना ती अंगठी २२ कॅरेट सोन्याची आहे का आणि त्यावर हॉलमार्क आहे का याची खात्री करा.

सोन्याचे भाव कमी असतानाही केलेली ही छोटी गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरू शकते आणि तुमची फॅशनही जपते.

१ ग्रॅमच्या दागिन्यांवर मजुरी खर्च थोडा जास्त असू शकतो. त्यामुळे खरेदीपूर्वी वेगवेगल्या सराफांकडे दराची तुलना करणं सोईचं ठरतं.

या अंगठ्यांचे वजन कमी असल्यामुळे लहान तरुणींच्या नाजूक हातांवर खूपच शोभून दिसतात.