बीट ज्यूस पिण्याचे ५ फायदे-त्वचेसाठी तर वरदान! दीपिका पादूकोणही आवडीने पिते बिटाचे ज्यूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2026 18:19 IST2026-04-28T16:58:03+5:302026-04-28T18:19:02+5:30
5 benefits of drinking beet juice - a boon for the skin! Deepika Padukone also drinks this juice : आरोग्यासाठी बीट ज्यूस फार चांगला.

बीट ज्यूस हा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि पौष्टिक आहे. शरीराला ऊर्जा देणारा, रक्तवाढीस मदत करणारा आणि त्वचेसाठीही उपयुक्त असा हा ज्यूस घरी अगदी सहज तयार करता येतो.

बीट ज्यूस करण्याची रेसिपी सोपी आहे. यासाठी मध्यम आकाराचे बीट, असेल तर गाजर, सफरचंद (ऐच्छिक), थोडं आलं, अर्धा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून त्यात पाणी घाला. सगळे तुकडे मिक्सरमध्ये घाला, त्यात थोडं आलं आणि पाणी घालून बारीक फिरवा. तयार मिश्रण गाळून घ्या. थंड करुन प्या.

बीट ज्यूस पिण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा ज्यूस रक्तवाढीस मदत करतो. बीटामध्ये आयर्न आणि फोलेट असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. त्यामुळे अशक्तपणा कमी होतो.

हा ज्यूस हृदयासाठीही चांगला आहे. बीटामध्ये असलेले नायट्रेट्स रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास हातभार लागतो.

तसेच, बीट ज्यूस त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. नियमित सेवन केल्यास त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसते. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासही तो मदत करतो.

याशिवाय हा ज्यूस ऊर्जा वाढवतो. थकवा जाणवत असेल तर एक ग्लास बीट ज्यूस लगेच ताजेतवाने करतो. व्यायाम करणार्यांसाठीही तो उपयोगी ठरतो.

याशिवाय हा ज्यूस ऊर्जा वाढवतो. थकवा जाणवत असेल तर एक ग्लास बीट ज्यूस लगेच ताजेतवाने करतो. व्यायाम करणार्यांसाठीही तो उपयोगी ठरतो.

















