PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)

चौकारासह स्वागत, मग जोफ्रानं वेगवान चेंडू टाकत घेतला बदला

By सुशांत जाधव | Updated: April 28, 2026 21:16 IST2026-04-28T21:16:12+5:302026-04-28T21:16:38+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Jofra Archer Win Battle With Priyansh Arya In PBSK vs RR Match Rajasthan Royals Pacer Took Wicket With 150 kmph speed ball | PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)

PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)

 Jofra Archer Win Battle With Priyansh Arya In PBSK vs RR Match : पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील न्यू चंडीगडच्या मुल्लानपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात प्रियांश आर्य आणि जोफ्रा आर्चर यांच्यात तगडी फाईट पाहायला मिळाली. डावातील दुसऱ्या षटकात नांद्रे बर्गरची धुलाई करत २१ धावा कुटल्यावर प्रियांश आर्यनं जोफ्रा आर्चर घेऊन आलेल्या तिसऱ्या षटकातही आपला आक्रमक अंदाज कायम ठेवत चौकारासह त्याचे स्वागत केले. पण शेवटी जोफ्रानं बाजी मारत त्याच्या वादळी खेळीला ब्रेक लावला. संघाला पहिले यश मिळवून देताना जोफ्रा आर्चरनं मोठा डावही साधला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

चौकारासह स्वागत, मग जोफ्रानं भन्नाट वेगवान चेंडू टाकत घेतला बदला



प्रियांश आर्य याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारल्यावर जोफ्रानं दोन निर्धाव चेंडू टाकत दमदार कमबॅक केले. १४२.३ किमी प्रतितास वेगाने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर जोफ्रानं विकेटची संधी निर्माण केली. पण यशस्वी जैस्वाल झेलसह या संधीचं सोन करण्यात कमी पडला. मग जोफ्रानं आपल्या चेंडूतील गती वाढवत परफेक्ट सेटअपसह विकेटचा डाव साधला. १५० kmph च्या वेगासह टाकलेल्या चेंडूवर त्याने प्रियांश आर्यला बर्गरकरवी झेलबाद केले. पंजाबच्या सलामीवीरानं ११ चेंडूत २९ धावा केल्या. प्रियांश आणि जोफ्रा आतापर्यंत दोन वेळा समोरासमोर आले आहेत. यात इंग्लंडचा जलदगती गोलंदाज भारतीय अनकॅप्ड सलामीवीरावर भारी पडला आहे. ६ चेंडूत ८ धावा खर्च करत जोफ्रानं दोन वेळा त्याची शिकार केली आहे.

"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा

जोफ्रानं पॉवर प्लेमध्ये साधला मोठा डाव

प्रियांश आर्यच्या रुपात विकेटसह जोफ्रा आर्चर यंदाच्या IPL हंगामातील पॉवरप्लेमधील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत त्याने पॉवरप्लेमध्ये ८.१६ च्या इकोनॉमी ९ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत कगिसो रबाडा (९ विकेट्स इकोनॉमी ९.३६), भुवनेश्वर कुमार ( ७ विकेट्स, इकोनॉमी ७.३१) आणि मोहम्मद शमी (६ विकेट्स, इकोनॉमी ६.८९) आघाडीच्या चारमध्ये आहेत.

Web Title : PBKS vs RR: आर्चर ने 150 किमी प्रति घंटे की गेंद से आर्य को आउट किया।

Web Summary : जोफ्रा आर्चर ने शानदार शुरुआत के बाद प्रियांश आर्य को आउट किया। आर्य ने आर्चर को चौका मारा, लेकिन आर्चर ने 150 किमी प्रति घंटे की गति से गेंद डालकर विकेट हासिल किया। आर्चर इस आईपीएल में पावरप्ले में सबसे ज्यादा विकेट लेने वाले गेंदबाज हैं।

Web Title : Archer's 150 kmph delivery dismantles Arya in PBKS vs RR clash.

Web Summary : Jofra Archer dismissed Priyansh Arya after a fiery start. Arya hit Archer for a four, but Archer retaliated with a 150 kmph delivery, securing the wicket. Archer leads powerplay wickets this IPL with nine.