इनडोअर प्लांट्स सुकून जातात- पानं पिवळी पडतात? ४ टिप्स- राेपं नेहमीच राहतील टवटवीत, हिरवीगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2026 13:18 IST2026-05-04T13:11:26+5:302026-05-04T13:18:16+5:30

इनडोअर प्लांट्स सुकून जात असतील किंवा त्यांची चांगली वाढ होत नसेल तर पुढे सांगितलेल्या काही टिप्स लक्षात ठेवा (4 tips for indoor plants). तुमचं इनडोअर प्लांट नेहमीच हिरवेगार आणि टवटवीत राहील.(how to take care of indoor plants?)

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते इनडोअर म्हणजेच सावलीत वाढणारं रोप असलं तरी आठवड्यातून दोन वेळा त्याला किमान १ ते २ तासांसाठी हलक्या उन्हात ठेवा. कडक ऊन त्या रोपावर पडणार नाही याची काळजी घ्या.(how to keep indoor plants fresh?)

इनडोअर रोपाला खूप पाणी घालण्याची गरज नसते. त्यामुळे रोज किंवा एक दिवसाआड घातलेलं पाणीही त्याला जास्त हाेतं आणि त्यामुळे मग रोपाची पानं पिवळी पडायला लागतात. इनडोअर प्लांट्सला आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळेसच पाणी घाला.

पाणी घालण्यापुर्वी कुंडीतली माती एकदा हातात घेऊन बघा. जर माती कोरडी वाटली तरच रोपाला पाणी घाला.

इनडोअर प्लांट असलं तरी ते घरात अगदीच एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात ठेवू नका. जिथे त्याला छान स्वच्छ सुर्यप्रकाश मिळेल तिथेच ते ठेवा. कारण सुर्यप्रकाश पुरेसा मिळाला नाही तरी इनडोअर रोपं कोमेजून जातात.
















