या ५ गोष्टीतून मुलांची अनोळखीबाबत करुन द्या ओळख, सुरक्षेसाठी गरजेचं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 04:21 PM2018-08-28T16:21:20+5:302018-08-28T16:36:10+5:30

मुलं हे फार साधी आणि निरागस असतात ते फार लवकर कुणाशीही मैत्री करतात. अनोळखी लोक मुलांच्या लहान याच निरागसपणाचा फायदा घेऊ शकतात. अशात लहान मुलांना अनोळखी लोकांसोबत मैत्री करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगा. (Image Credit : www.parenting.in)

लहान मुलांना योग्य आणि चुकीच्या लोकांची ओळख करुन देणे सोपे काम नाहीये. अशात त्यांना प्रेमाने आणि संयमाने समजावून सांगावे लागेल. प्रत्येक चॉकलेट देणारा काका किंवा मावशी किंवा दादा चांगले नसतात. त्यांच्या बोलण्यात येऊ नये. त्यांना सोप्या शब्दात सांगा की, प्रत्येक अनोळखी व्यक्ती तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. जे तुम्हाला माहीत नाहीये, ज्यांना तुम्ही पाहिलं नाहीये किंवा ज्याच्याशी कधी बोलणं झालं नाही. असे सगळे अनोळखी लोक वाईट असतात. त्यामुळे प्रयत्न करा की, तुमच्या उपस्थितीतच बाहेरच्या लोकांशी ओळख करुन द्या. नाही तर पुढे जाऊन मुलं लोकांना भेटण्यास घाबरतील. शेजारच्या काकूंची ओळख करुन द्या, पोलीस काकांसोबत ओळख करुन द्या. जेणेकरुन वेळ पडल्यास यांची मदत मिळेल. (Image Credit : www.momjunction.com)

लहान मुलांना हे सांगणे गरजेचे आहे की, एकटं एकांतात किंवा आडवाटेला जाणं अडचणीचं ठरु शकतं. त्यांना खेळण्यासाठी पडकं घर, पार्किंग, अंधाऱ्या गल्ली आणि रस्त्यांवर जाऊ नये. लहान मुलांना त्या रस्त्यांची आणि जागेंची माहिती द्या जिथे ते मदतीसाठी जाऊ शकतील. जसे पोलीस स्टेशन, शाळा किंवा कुणी ओळखीच्या घरी. प्रयत्न करा की, लहान मुलांना त्यांचं नाव, आई-वडिलांचे नाव, घराचा पत्ता लक्षात राहिल. (Image Credit : fermentationwineblog.com)

लहान मुलांचा योग्य आणि चुकीच्या स्पर्शाबाबत सांगणे फार गरजेचे आहे. असे केवळ मुलींसाठीच नाही तर मुलांसाठीही गरजेचे आहे. मुलांना समजावून सांगा की, आई-वडिलांशिवाय कुणाच्याही मांडीवर जाऊ बसू नये. या गोष्टी एकदाच आणि सहजपणे समजावल्या जाऊ शकत नाही. त्यांना हे सतत वेळोवेळी सांगावे लागेल. त्यांच्या गोष्टीही गंभीरतेने ऐकणे गरजेचे आहे. (Image Credit : thedanishway.com)

तुम्ही प्रत्येक क्षणाला किंवा प्रत्येकवेळी मुलांसोबत राहू शकत नाही. अशावेळी मुलांना स्वत:ला जबाबदारीची सवय लावली पाहिजे. त्यांना हे सांगा की, जास्त दूर खेळायला गेल्याने काय अडचण होते. त्यांना हेही सांगा की जर कुणी त्यांना सोबत चलण्यास सांगितलं तर नकार देणे का गरजेचे आहे. हे हळूहळू मुलांना कळेल. त्यांना एखादा खेळ शिकवा, जसे की त्यांना एखादा पासवर्ड गेम द्या आणि सांगा की, ज्यांना या गेमचा पासवर्ड माहीत असेल त्यांच्यासोबतच जायचं. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासोबत जाऊ नये. (Image Credit : www.babycenter.com)

प्रयत्न हाच करा की, तुमची लहान मुले दुसऱ्या लहान मुलांमध्येच खेळतील. त्यांचं सर्कल वाढेल तेव्हाही अनोळखी लोकांसोबत त्यांचं जाणं घातक ठरु शकतं. अशाने ते अनोळखी लोकांकडे आकर्षितही कमी होतील. त्यांच्या मित्रांसोबत मैत्री ठेवा जेणेकरुन तो कुठे जातोय हे तुम्हालाही माहीत असायला हवं. (Image Credit : Education.com)