Photos: पुणे शहर पोलिसांची मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना अनोखी मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 03:22 PM2021-11-26T15:22:14+5:302021-11-26T15:24:57+5:30

कुछ बाद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आये... या गीताप्रमाणे मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यासाठी पुणे पोलीस दलासह पुणेकरही सारसबागेत जमले. पुणे शहर पोलिसांनी शहीद सैनिकांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या ठेक्यामध्ये मानवंदना दिली. या स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करताना पोलीस बांधवांसह सामान्यांचेही डोळे पाणावले. भारत माता की जय... शहीद जवान, पोलीस अमर रहे... च्या घोषणांनी सारसबागेचा परिसर दुमदुमून गेला. (सर्व छायाचित्रे :- तन्मय ठोंबरे)