Fittest Woman: 'ही' आहे जगातली सर्वात फीट महिला, फोटो पाहूनच फुटेल भल्याभल्यांना घाम....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 07:51 PM2021-07-19T19:51:25+5:302021-07-19T20:00:53+5:30

Tia Clair Toomey : ऑस्ट्रेलियाची टिया २७ जुलैला सुरू होणाऱ्या क्रॉसफिट गेम्समध्ये मैदानात उतरणार आहे. टियाने मोठ्या मेहनतीने आपल्या शरीराला फीट बनवलं आहे.

मनुष्य फीट राहणं सर्वात महत्वाचं आहे. अशात जेव्ह फिटनेसचा विषय निघतो तेव्हा जगातल्या सर्वात फीट महिलेची (Fittest Women in the World) चर्चा होतेच. तुम्हाला जर जगातली सर्वात फीट महिला माहीत नसेल तर आज आम्ही तिच्याबाबत तुम्हाला सांगणार आहोत. जगातल्या सर्वात फीट महिलेचं नाव आहे टिया क्लेअर टूमी. आतापर्यंत चार वेळा तिने क्रॉसफिट गेम्समध्ये किताब मिळवला आहे. ती फिटनेससाठी काय करते हे आज आम्ही तुम्हाला सांगतो.

टिया क्लेअर टूमी (Tia Clair Toomey) जगातली सर्वात फीट महिला आहे. यावर्षी २०२१ मध्ये जर CrossFit games मध्ये टियाने किताब मिळवला तर पुरूष वर्गात मॅट फ्रेसरने बनवलेला वर्ल्ड रेकॉर्डची ती बरोबरी करेल.

टिया सोशल मीडियावरही सुपरस्टारपेक्षा कमी नाही. यूट्यूबवर तिचे मोठ्या प्रमाणात फॅन्स आहेत. फिटनेसबाबत नेहमीच सिरीअस राहणाऱ्या टियाने तिचा डाएट चार्ट तिच्या चॅनलवर शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलियाची टिया २७ जुलैला सुरू होणाऱ्या क्रॉसफिट गेम्समध्ये मैदानात उतरणार आहे. टियाने मोठ्या मेहनतीने आपल्या शरीराला फीट बनवलं आहे.

menshealth.com मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, क्रॉसफिट गेम्सआधी टिया सध्या तिच्या फिटनेसवर पूर्ण लक्ष देत आहे. ती ब्रेकफास्ट दोनदा करते. पहिल्या नाश्त्यात ती एक कप ओटमील्स, ब्लूबेरी, एक केळं आणि एक चमचा मध घेते.

सकाळी कार्डिओ एक्सरसाइज सेशन झाल्यावर ती दुसरा ब्रेकफास्ट करते. ज्यात ती गव्हाच्या पीठापासून तयार ब्रेड टॉपिंगसोबत खाते. तेच एक उकडलेलं अंड, पीनट बटर आणि ब्लॅकबेरी जॅम खाते. टियाच्या डाएट चार्टमध्ये डॉक्टरांच्या सर्टिफाइड औषधांचाही समावेश आहे.

टियानुसार, पाणी पिऊन ती दिवसाची सुरूवात करते. हेवी नाश्त्याने फिटनेस सेशनसाठी एनर्जी मिळते. पीनट बटर आणि जॅम आवश्यक घेते. जेणेकरून पोट रिकामं राहू नये.

टिया म्हणाली की, तिला सर्वात जास्त काळजी तिच्या फिटनेसची असते. ती मानसिक आरोग्याचीही काळजी घेते. तिने सांगितलं की ती प्रॉपर न्यूट्रिशिअन्ससाठी मिल्क प्रोटीन आणि सप्लीमेंट्सचा वापर करते.