सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 19:39 IST2026-05-12T19:38:39+5:302026-05-12T19:39:51+5:30

जत तालुक्यातील मोटेवाडी येथील घटना, वादळी वाऱ्यापासून बचावासाठी घेतलेला आसराच ठरला जीवघेणा

Tragedy in Sangli six Dead Including Two Children as Temple Wall Collapses During Storm | सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश

सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश

Sangli Wall Collapse:सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात मोटेवाडी(ता.जत) येथील मरगुबाई मंदिराची भिंत कोसळून सोमवारी दोन मुलांसह सहाजणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत आठ लोक जखमी झाले आहेत. वादळी वाऱ्यामुळे बचावासाठी ज्या मंदिराच्या भिंतीचा आसरा घेतला तीच भिंत जीवघेणी ठरली. 
मृतांमध्ये अरुण विष्णू गेजगे (वय १४, रा. डोमनाळ, विजयपूर, कर्नाटक), सोन्या लक्ष्मण गेजगे (वय १४, रा. डोमनाळ, विजयपूर) आणि कोंडीबा राऊबा गेजगे (वय ६५, रा. दारिबडची) यांचा समावेश आहे. उर्वरित तिघेची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.

याबाबत माहिती अशी की, जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीची यात्रा भरली होती. सोमवारी सायंकाळी जोरदार वादळी वारे सुटले. त्यापासून बचावासाठी परिसरातील काही नागरिकांनी मरगुबाई मंदिराकडे धाव घेतली. मंदिराच्या एका भिंतीजवळ आसरा घेतला. त्याच दरम्यान वादळी वाऱ्याच्या तडाख्याने मंदिराची भिंत अचानक कोसळली. या भिंतीखाली सापडून अरुण विष्णू गेजगे, सोन्या लक्ष्मण गेजगे आणि कोंडीबा राऊबा गेजगे यांच्यासह सहाजणां मृत्यू झाला. या दुर्घटनेत आठजण जखमी झाले आहेत. दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर परिसरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिस आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा सुरू केला आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे मोटेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title : सांगली में हादसा: मंदिर की दीवार गिरने से दो बच्चों समेत छह की मौत

Web Summary : सांगली के जत में तेज हवाओं के कारण एक मंदिर की दीवार गिर गई, जिसमें दो बच्चों सहित छह लोगों की मौत हो गई। मंदिर में त्योहार के दौरान आठ अन्य घायल हो गए। घायलों का इलाज चल रहा है, अधिकारी जांच कर रहे हैं।

Web Title : Sangli Tragedy: Temple Wall Collapse Kills Six, Including Two Children

Web Summary : In Sangli's Jat, a temple wall collapsed due to strong winds, killing six, including two children. Eight others were injured during a temple festival. Injured are receiving treatment as authorities investigate the incident.