पंतप्रधान नरेंद्र मोदींना रजनीकांतने दिल्या 'रजनीस्टाईल शुभेच्छा'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 06:36 PM2020-09-17T18:36:35+5:302020-09-17T18:50:58+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 70 वा वाढदिवस आहे, त्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच क्षेत्रातील दिग्गजांकडून मोदींना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

अभिनेता अनुपम खेर यांच्या मातोश्रींनीही व्हिडिओ बनवून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

सुपरस्टार रजनीकांतने पंतप्रधान नरेद्र मोदींनी कणखर माणूस म्हणत कठीण काळातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

गायक कैलास खेरनेही शुभेच्छा दिल्या असून मोदींनी आभार मानले आहेत.

अभिनेता महेश बाबूनेही मोदींना पोलादी व्यक्तीमत्व असे संबोधत शुभेच्छा दिल्या आहेत, मोदींनीही महेश बाबूंचे आभार मानले आहेत.

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही मोदींना शुभेच्छा दिल्या असून मोदींनी आभार मानले आहेत.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरनेही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता कमल हसन आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या सुप्रिमो मायावती यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

पार्थ पवार यांनीही मोदींना आवर्जून शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही, देशवासीयांना न्याय देण्याचं काम आपल्याकडून होईल, असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.