क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS

Who is Navya Nair, Yuvraj Singh Video: अभिनेत्रीने फुलांच्या गजऱ्यासाठी मोजले होते १ लाख १४ हजार रूपये

भारतीय संघाचा सिक्सर किंग माजी क्रिकेटर युवराज सिंग याचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक सौंदर्यवती स्मितहास्य करत सर्वांची मनं जिंकताना दिसत आहे. ती नेमकी कोण?

युवराज सिंगसोबत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा-गोष्टी करणाऱ्या त्या सौंदर्यवतीचे नाव आहे प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री नव्या नायर. नव्याचा जन्म १४ ऑक्टोबर १९८५ रोजी केरळमधील अलेप्पीमध्ये झाला.

नव्याचे वडील दूरसंचार कंपनीत कर्मचारी होते, तर त्यांची आई शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, नव्या नायरने इंग्रजी विषय घेऊन बीए केले आणि एमबीएची पदवीही मिळवली.

उच्चशिक्षण पूर्ण केल्यावर तिने अभिनयाची वाट धरली. दिग्दर्शक सिबी मलयिल यांच्या सल्ल्यानुसार, तिने आपले नाव धन्या वरून बदलून नव्या ठेवले, कारण पूर्वीचे नाव इंडस्ट्रीत प्रभावी ठरणार नाही असे तिला सांगितले होते.

नव्या हिने चित्रपटसृष्टीत प्रभाव पाडण्यासाठी आणि रुपेरी पडद्यावर चमक दाखवण्यासाठी आपले नाव बदलले हे फार कमी लोकांना माहीत आहे. तिच्या नवीन नावाला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळाला.

नव्या नायरने २००१ मध्ये दिलीपसोबत 'इष्टम' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने २००२ च्या 'नंदनम' या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारली. तिने अनेक पुरस्कारही मिळवले.

२००५ हे साल तिच्यासाठी प्रचंड फायद्याचे आणि लोकप्रियतेचे ठरले. या वर्षात तिने 'कन्ने मदनगुक्का', 'सैरा', 'मजतुल्लिक्किलुक्कम', 'कुंजिकूनन', 'कल्याणरामन', 'ग्रामफोन', 'जलोलसवम', 'दृश्या' हे चित्रपट केले.

नंतर 'ओरुथी' (२०२२) आणि अगदी अलीकडे 'जानकी जाने' (२०२३) यांसारख्या अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये तिने काम केले आहे. सध्या ती युवराज सिंगसोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावल्याने चर्चेत आली आहे

याआधी ऑस्ट्रेलियातील विमानतळावर तिच्या बॅगेत गजरा असल्यामुळे तिला अंदाजे १ लाख १४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्या घटनेचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.