घरी सुरू लगीनघाई, डेकोरेशनच्या 'या' आयडिया लय भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 12:03 PM2020-02-18T12:03:01+5:302020-02-18T12:25:22+5:30

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. लग्नाच्या निमित्ताने घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल असते. आकर्षक रोषणाई आणि विविध गोष्टींनी घर सजवलं जातं.

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. काही जण साध्या पद्धतीने तर काही धुमधडाक्यात लग्न करतात. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत.

लग्नाच्या निमित्ताने घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल असते. आकर्षक रोषणाई आणि विविध गोष्टींनी घर सजवलं जातं.

मेहंदी, हळद, लग्न यासारख्या विधींसाठी हटके आणि सुंदर डेकोरेशन करण्याचा सध्या ट्रेंड आहे.

घरामध्ये शुभ कार्य असल्यास फुलांना विशेष महत्त्व असतं. घरातील भिंती वेगवेगळ्या फुलांच्या मदतीने सजवता येतात.

घराला सुंदर फुलांचं तोरण लावलं जातं. तसेच मुख्य दरवाजाही फुलांनी आकर्षकरित्या सजवला जातो.

रंगीबेरंगी, सुगंधी फुलांच्या मदतीने घर सजवता येतं. तसेच यामुळे घरात उत्साहाचं वातावरण देखील निर्माण होतं.

फोटोंच्या माध्यमातून आठवणी जपून ठेवल्या जातात. त्यामुळे लग्नाच्या वेळी जुन्या फोटोंचं कोलाज करून आठवणींना उजाळा द्या.

मेहंदी, हळदीला असं डेकोरेशन नक्की करा

फक्त लग्न नाही तर एखाद्या सणाला अथवा छोट्या समारंभाला, शुभ कार्याला देखील सुंदर डेकोरेशन करता येतं.