Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 11:14 IST2026-04-15T11:12:10+5:302026-04-15T11:14:29+5:30

Bhagwant Mann And Ashok Mittal : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभेतील उपनेते अशोक मित्तल यांचं घर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. या कारवाईनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

Punjab Politics Bhagwant Mann takes dig at ed raids on Ashok Mittal | Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा

Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि राज्यसभेतील उपनेते अशोक मित्तल यांचं घर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. या कारवाईनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याप्रकरणी भाजपावर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर मान यांनी लिहिलं की, "भाजपाद्वारे पंजाब निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांचं घर आणि युनिव्हर्सिटीमध्ये ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल आहे. आम्ही ती पानं नाही जी फांदीवरून तुटून खाली पडतील, वादळांना सांगा की, त्यांनी आपल्या मर्यादेत राहावं."

" पंजाब निवडणुकीची तयारी सुरू

आम आदमी पार्टीच्या हरियाणा युनिटचे नेते अनुराग ढांडा यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. त्यांनी लिहिलं की, "भाजपाने पंजाब निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार आणि सभागृहातील पक्षाचे उपनेते अशोक मित्तल यांच्याकडे ईडीची कारवाई सुरू आहे. भाजपा कुठेही स्वतःच्या हिंमतीवर निवडणूक लढवू शकत नाही का? भाजपा इतकी हतबल झाली आहे का की त्यांच्या निवडणुकीची सर्व तयारी ईडी आणि सीबीआयच्या कारवाईनेच सुरू होते? मोदी सरकार एका हुकूमशहाप्रमाणे काम करत आहे. पंजाबचे लोक आम आदमी पार्टीच्या पाठीशी आहेत. भाजपावाल्यांनो, करत राहा ईडी आणि सीबीआयचा वापर."

वृत्तसंस्था 'एएनआय' (ANI) ने दिलेल्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितलं की, फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (FEMA) च्या उल्लंघनाप्रकरणी ईडीने आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार आणि वरिष्ठ सभागृहातील उपनेते डॉ. अशोक कुमार मित्तल यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापेमारी केली आहे. यामुळे राजकारण तापलं आहे. 

Web Title : भगवंत मान ने अशोक मित्तल पर ईडी की छापेमारी को 'मोदी स्टाइल' बताया।

Web Summary : पंजाब के मुख्यमंत्री भगवंत मान ने आप सांसद अशोक मित्तल के घर और कार्यालय पर ईडी की छापेमारी की आलोचना की। उन्होंने भाजपा पर पंजाब चुनावों से पहले ईडी का इस्तेमाल राजनीतिक उद्देश्यों के लिए करने का आरोप लगाया, और इसे 'टिपिकल मोदी स्टाइल' करार दिया।

Web Title : Bhagwant Mann slams ED raid on Ashok Mittal as 'Modi style'.

Web Summary : Punjab CM Bhagwant Mann criticizes the ED raid on AAP MP Ashok Mittal's home and office. He accuses BJP of using ED for political purposes ahead of Punjab elections, calling it 'typical Modi style'.