Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 18:28 IST2026-04-15T09:54:15+5:302026-04-15T18:28:29+5:30

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Maharashtra Marathi News Live Updates 15 April 2026: US Iran Talks, Israel stand on war, Strait of Hormuz, Donald Trump, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL 2026, Ashok Kharat Crime case, Fuel Prices, BJP CM in Bihar | Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?

Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

15 Apr, 26 : 06:31 PM

मिरा-भाईंदरमध्ये “झॉम्बी ड्रग”चा शिरकाव? सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

बंगळुरू, बिहार आणि चंदीगडनंतर आता मिरा-भाईंदर शहरातही तथाकथित “झॉम्बी ड्रग” संदर्भातील धक्कादायक प्रकरणे समोर येत असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सार्वजनिक सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

15 Apr, 26 : 05:36 PM

ठाण्यात काँग्रेसचे ‘संघटन सृजन अभियान’; नव्या नेतृत्वाच्या निवडीचे संकेत

देशासह राज्यात संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभर राबविण्यात येत असलेले ‘संघटन सृजन अभियान’ ठाणे शहरात सुरू झाले आहे.

15 Apr, 26 : 05:20 PM

अमेरिका-इराण यांच्यातील युद्धविराम वाढण्याची शक्यता

अमेरिका इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवड्यासाठी वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे या दोन्ही देशातील उच्चस्तरीय नेत्यांची बैठक पार पडली होती. मात्र या बैठकीत काही ठोस तोडगा निघाला नाही. त्यानंतर अमेरिकेने होर्मुझच्या नाकेबंदीची घोषणा केली. सध्या दोन्ही देशात तणाव असला तरी युद्धविरामाचे उल्लंघन झाले नाही. आता युद्धविराम आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

15 Apr, 26 : 04:59 PM

जनता माफ करणार नाही, फडणवीसांनी राजीनामा द्यावा - काँग्रेस

भाजपा महायुती सरकारकडून ‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप सुरू आहे. महाराष्ट्राची जनता महायुतीला माफ करणार नाही. ड्रग्जचा काळाधंदा, खरात प्रकरण, नाशिक व अमरावतीतील महिलांच्या लैंगिक शोषणाचा घटना हे गृहविभागाचे अपयश असून फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.  

15 Apr, 26 : 04:57 PM

"धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदाराचा गंभीर आरोप

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी धारावीसंदर्भात एक पोस्ट एक्सवर केली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त रहिवाशांना अपात्र ठरवणाऱ्या एका बेकायदेशीर सर्वेक्षणाचा आधार घेत निष्कासनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत."

"मेघवाडी, गणेश नगर, आझाद नगर आणि कमला रमण नगरमधील रहिवाशांना पावसाळ्यापूर्वीच घरे सोडण्यास भाग पाडले जात आहे! मेघवाडीत तर ५०५ पैकी केवळ ५५ लोक या खोट्या सर्वेक्षणानुसार पात्र ठरवण्यात आले आहेत", असा आरोप खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. 

"आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आहोत की, हा संपूर्ण प्रकल्प आहे त्याच ठिकाणी असायला हवा. प्रत्येक धारावीकर पात्र आहे आणि त्यांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे. जेव्हा सर्वेक्षणच संशयास्पद आहे, तेव्हा त्याच्या आधारावर निष्कासनाच्या नोटिसा कशा दिल्या जाऊ शकतात?", असा सवालही वर्षा गायकवाड यांनी केला आहे. 

"धारावीकरांना धारावीबाहेर फेकून देण्याची आणि पंतप्रधानांच्या परममित्राला जमिनी बळकावता याव्यात, यासाठी केलेली ही आणखी एक खेळी आहे. आम्ही या जबरदस्तीने केल्या जाणाऱ्या हकालपट्टीला विरोध करू. धारावी फक्त धारावीकरांचीच आहे", असा इशारा त्यांनी दिला. 

15 Apr, 26 : 04:55 PM

नाशिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात आरोपीला न्यायालयीन कोठडी

नाशिक शहरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, धर्मांतर व एक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या कंपनीच्या तत्कालीन प्रशासकीय अधिकारी संशयित अश्विनी चेनानी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. पोलीस कोठडीचा हक्क राखून ठेवत मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी नरवाडीया यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली.

15 Apr, 26 : 04:02 PM

अदानी प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; ५ मे रोजी धरणावर धडक मोर्चा

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा अदानी प्रोजेक्ट बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पाणी पळवणाऱ्या या प्रोजेक्टविरोधात ५ मे रोजी हजारो शेतकरी धरणावर धडक मोर्चा काढणार आहेत. धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.

15 Apr, 26 : 04:01 PM

'अमेरिका-इस्रायलचे हे वागणे इराणी जनता स्वीकारणार नाही', राष्ट्रपती पेझेश्कियान यांचे विधान

अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा शांतता चर्चा सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापूर्वी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनी एक विधान केले आहे. 

अमेरिका किंवा इस्रायलकडून इराणला झुकवण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांचे हे प्रयत्न अपयशी ठरतील, असे ते म्हणाले आहेत. 

तेहरानमध्ये आपतकालीन सेवेतील अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. "इराणी जनता कधीही अमेरिका आणि इस्रायलचे असे वागणे स्वीकारणार नाही. इराणने नेहमीच वेगवेगळ्या देशांसोबत चांगले संबंध असावेत, यावर जोर दिलेला आहे", असे ते म्हणाले. 

15 Apr, 26 : 03:50 PM

नाशिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात आरोपीला न्यायालयीन कोठडी

नाशिक शहरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, धर्मांतर व एक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या कंपनीच्या तत्कालीन प्रशासकीय अधिकारी संशयित अश्विनी चेनानी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. पोलीस कोठडीचा हक्क राखून ठेवत मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी नरवाडीया यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली.

15 Apr, 26 : 03:09 PM

अचलपूर लैंगिक शोषण प्रकरण: आरोपींवर SIT मार्फत कारवाईची मागणी

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील तरुणीचे लैंगिक शोषण करून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या आणि त्यांच्या सर्व साथीदारांवर मोक्कासह कठोर कलमान्वये कारवाई करावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने आज पोलीस प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.

15 Apr, 26 : 12:44 PM

अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून एक संतापजनक 'व्हिडीओकांड' समोर आले आहे. एका १९ वर्षीय तरुणाने अनेक तरुणींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडीओ व अनेक आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली आहे. दरम्यान, आता आरोपी अयान याच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. 

15 Apr, 26 : 12:14 PM

भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली

पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. भाविकांनी भरलेली एक बस अचानक अनियंत्रित होऊन उलटली. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २५ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर 

15 Apr, 26 : 11:30 AM

भगवंत मान यांचा निशाणा

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि राज्यसभेतील उपनेते अशोक मित्तल यांचं घर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. या कारवाईनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याप्रकरणी भाजपावर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर मान यांनी लिहिलं की, "भाजपाद्वारे पंजाब निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांचं घर आणि युनिव्हर्सिटीमध्ये ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल आहे." वाचा सविस्तर

15 Apr, 26 : 11:08 AM

बिहारमध्ये २४ वे मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरींनी घेतली शपथ

सम्राट चौधरी हे बिहारचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. सम्राट चौधरी यांनी बुधवारी बिहार लोक भवनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यासह, बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री असण्याची ही पहिलीच वेळ आहे. माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी राजीनामा दिला.

15 Apr, 26 : 10:06 AM

लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार?

केंद्र सरकारने लोकसभेची सदस्यसंख्या सध्याच्या ५४३ वरून थेट ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ‘संविधान (१३१ वी सुधारणा) विधेयक, २०२६’द्वारे हा बदल सुचवण्यात आला असून, महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.  

15 Apr, 26 : 10:03 AM

बीकेसीमध्ये क्रेन कलंडल्याने वाहतूक कोंडी

वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात बुधवारी सकाळी मेट्रो कामादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. मेट्रोचा खांब उभारण्याचे काम सुरू असताना बीम उचलणारी क्रेन अचानक उलटली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates 15 April 2026: US Iran Talks, Israel stand on war, Strait of Hormuz, Donald Trump, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL 2026, Ashok Kharat Crime case, Fuel Prices, BJP CM in Bihar