Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस

'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस

Nvidia Bonus News: टेक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही बातमी एखाद्या मोठ्या आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही. टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना ५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत बोनस देण्याची घोषणा केलीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 12:47 IST2026-04-15T12:42:37+5:302026-04-15T12:47:27+5:30

Nvidia Bonus News: टेक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही बातमी एखाद्या मोठ्या आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही. टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना ५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत बोनस देण्याची घोषणा केलीये.

Nvidia share price giant tech company has a big gift for Indian employee Bonuses ranging from Rs 5 lakh to Rs 1 crore | 'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस

'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस

Nvidia Bonus News: टेक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही बातमी एखाद्या मोठ्या आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही. जगातील दिग्गज चिप मेकर कंपनी 'Nvidia' नं आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत खास 'स्टॉक बोनस' देण्याची घोषणा केली आहे. या बोनसअंतर्गत कर्मचाऱ्यांना ५ लाख रुपयांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. हा बोनस पूर्णपणे कंपनीच्या शेअर्सच्या (इक्विटी) स्वरूपात दिला जात आहे.

काय आहे 'जेन्सेन स्पेशल ग्रँट'?

हा विशेष बोनस 'जेन्सेन स्पेशल ग्रँट' (Jensen Special Grant) या नावानं दिला जात आहे, जो कंपनीचे सीईओ जेन्सेन हुआंग यांनी २०२४ मध्ये सुरू केला होता. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या आधीच्या स्टॉक पॅकेजच्या (RSUs) व्यतिरिक्त २५% अतिरिक्त शेअर्स दिले जात आहेत.

पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी

RSU म्हणजे काय आणि हे बोनस कसे मिळणार?

RSU (Restricted Stock Units) म्हणजे कंपनीचे असे शेअर्स जे ठराविक कालावधीनंतर कर्मचाऱ्याला मिळतात. कंपनीचा हा बोनस एकाच वेळी न मिळता पुढील ४ वर्षांत हप्त्यांच्या स्वरूपात दिला जाईल. याची प्रक्रिया २०२४ मध्ये सुरू झाली असून ती २०२८ पर्यंत सुरू राहील. कर्मचारी कंपनीत जितका जास्त काळ टिकून राहतील, तितका जास्त फायदा त्यांना मिळत राहील. म्हणूनच कंपन्या कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ जोडून ठेवण्यासाठी या पद्धतीचा वापर करतात.

भारतीय कर्मचाऱ्यांवर पैशांचा पाऊस

एका रिपोर्टनुसार, Nvidia च्या सुमारे १०,००० भारतीय कर्मचाऱ्यांपैकी बहुतेकांना याचा लाभ मिळाला आहे. उदाहरणार्थ, एका मध्यम-स्तरीय कर्मचाऱ्याला त्याच्या २१ लाख रुपयांच्या मूळ स्टॉक पॅकेजव्यतिरिक्त ५.३ लाख रुपयांचा अतिरिक्त बोनस मिळाला आहे. तर वरिष्ठ इंजिनिअर्स आणि AI एक्सपर्ट्सची वार्षिक कमाई २ ते ३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे, ज्यामध्ये ५०% ते ७५% हिस्सा हा केवळ शेअर्सचा आहे.

शेअर्सच्या माध्यमातून कमाईचा नवा ट्रेंड

हा ट्रेंड दर्शवतो की, टेक आणि AI क्षेत्रात आता पगाराचा मोठा भाग रोख रकमेऐवजी कंपनीच्या शेअर्सच्या स्वरूपात दिला जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कंपनीच्या प्रगतीचा थेट फायदा मिळतो. जर कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढली, तर कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नातही मोठी वाढ होते.

Nvidia ची शेअर बाजारातील कामगिरी

Nvidia च्या शेअरमध्ये अलीकडच्या काळात मजबूत कामगिरी पाहायला मिळत आहे. १४ एप्रिल २०२६ रोजी अमेरिकन स्टॉक एक्सचेंज 'NASDAQ' वर हा शेअर १.४६% च्या वाढीसह १९२.०७ डॉलर्सवर बंद झाला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा सेंटर व्यवसायातील सातत्यपूर्ण वाढीमुळे गुंतवणूकदारांचा या कंपनीवर मोठा विश्वास आहे. सुरुवातीच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांचा पगार मर्यादित असला तरी, अनुभवासोबत इक्विटीचा हिस्सा वाढत जातो. Nvidia चं हे पाऊल भारतीय टेक क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करत आहे.

Web Title : Nvidia का भारतीय कर्मचारियों को बड़ा तोहफा: 1 करोड़ रुपये तक बोनस!

Web Summary : Nvidia ने भारतीय कर्मचारियों को जेन्सेन स्पेशल ग्रांट के तहत 5 लाख से 1 करोड़ रुपये तक का बोनस दिया। कर्मचारियों को चार वर्षों में अतिरिक्त शेयर मिलेंगे, जिससे कंपनी के विकास के साथ आय बढ़ेगी। इस कदम से लगभग 10,000 कर्मचारी प्रभावित होंगे।

Web Title : Nvidia's massive bonus for Indian employees: Up to ₹1 crore!

Web Summary : Nvidia gifts Indian employees bonuses from ₹5 lakh to ₹1 crore via stock options under Jensen Special Grant. Employees receive additional shares over four years, boosting earnings with company growth. The move impacts around 10,000 employees.