'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 12:56 IST2026-04-15T12:56:15+5:302026-04-15T12:56:59+5:30

बनावट मॅट्रिमोनियल साईट चालवून ७ हजारहून अधिक लोकांना १.११ कोटी रुपयांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

They promised to 'get a beautiful wife' and robbed 7,000 people; This is how the game of the matrimonial site that deceives people turned out! | 'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!

'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!

"सुंदर मुलगी पाहू, लवकर लग्न लावून देऊ," अशा गोड शब्दांत भुलवून हजारो तरुणांना कंगाल करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा छत्तीसगडमधील रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. केवळ छत्तीसगडच नव्हे, तर देशभरातील तब्बल ७,६९३ लोकांना या टोळीने आपल्या जाळ्यात ओढले असून, त्यांच्याकडून १.११ कोटी रुपयांची लूट केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह २६ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

असा चालायचा काळा धंदा

रायगडमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोगा पारा परिसरात 'निधी परिवहन सुविधा केंद्र' नावाचे एक लोक सेवा केंद्र चालवले जात होते. बाहेरून पाहता येथे लायसन्स आणि आरटीओची कागदपत्रे बनवली जात असल्याचे भासवायचे, मात्र या केंद्राच्या आत एक हायटेक कॉल सेंटर सुरू होते. या ठिकाणी अनेक तरुणींना कामावर ठेवण्यात आले होते. या तरुणी यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडियावरील बनावट प्रोफाईल्सच्या माध्यमातून लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना कॉल करायच्या.

नाव नोंदणीच्या नावाखाली वसुली

त्यांची लोकांना फसवण्याची पद्धत अतिशय नियोजनबद्ध होती. सुरुवातीला नोंदणी शुल्काच्या नावाखाली काही पैसे घेतले जायचे. त्यानंतर समोरच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन मीटिंग फिक्स करणे, प्रोफाईल अपडेट करणे अशा वेगवेगळ्या कारणांसाठी 'यूपीआय'द्वारे पैसे उकळले जायचे. एकदा का पैसे मिळाले की, या टोळीचे सदस्य संबंधित व्यक्तीचा नंबर ब्लॉक करायचे किंवा संपर्क तोडून टाकायचे.

पोलिसांची धाडसी कारवाई

पोलिसांना या केंद्रात काहीतरी संशयास्पद सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सायबर सेल आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे धाड टाकली. यावेळी आत सुरू असलेले प्रकार पाहून पोलीसही चक्रावून गेले. तिथे बसलेल्या तरुणी बनावट कागदपत्रे आणि व्हिडिओ एडिटिंगच्या साहाय्याने खोटे प्रोफाईल्स बनवत होत्या. पोलिसांनी घटनास्थळावरून ५५ मोबाईल, १३ लॅपटॉप, २ प्रिंटर आणि बनावट शिक्के जप्त केले आहेत.

मास्टरमाईंडचा 'असा' झाला उदय

या टोळीचा म्होरक्या कपिल गर्ग हा पूर्वी आरटीओची कामे करायचा. मात्र, त्याची आयडी रद्द झाल्यानंतर त्याने पैसे कमवण्याचा हा शॉर्टकट निवडला. त्याने हिमांशु मेहर आणि इतर साथीदारांना सोबत घेऊन २०२२ पासून हे रॅकेट चालवले होते. या टोळीने तीन वर्षांत कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमा केला होता. सध्या सर्व २६ आरोपींची रवानगी जेलमध्ये करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title : फर्जी विवाह साइट ने हजारों को ठगा, छत्तीसगढ़ में गिरफ्तारियां

Web Summary : छत्तीसगढ़ में एक विवाह घोटाले में हजारों लोगों को शादी के झूठे वादे करके ₹1.11 करोड़ लूटे गए। पुलिस ने सरगना सहित 26 लोगों को गिरफ्तार किया, और एक सेवा केंद्र के रूप में प्रस्तुत एक परिष्कृत कॉल सेंटर का भंडाफोड़ किया। गिरोह ने नकली प्रोफाइल का इस्तेमाल किया और संपर्क काटने से पहले विभिन्न धोखाधड़ी शुल्कों के माध्यम से पैसे निकाले।

Web Title : Fake Matrimonial Site Duped Thousands, Arrests Made in Chhattisgarh

Web Summary : A matrimonial scam in Chhattisgarh lured thousands with false promises of marriage, stealing ₹1.11 crore. Police arrested 26, including the mastermind, uncovering a sophisticated call center posing as a service center. The gang used fake profiles and extracted money through various fraudulent charges before cutting off contact.