​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 14:07 IST2026-04-15T14:01:35+5:302026-04-15T14:07:02+5:30

तब्बल ४७ अनुभवी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांची फौज या एका प्रकरणाच्या तपासासाठी तैनात करण्यात आली आहे...

​Paratwada pornographic video scandal SIT of 47 people in the field for investigation Number of accused will increase | ​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 

​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 


अमरावती: संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या परतवाडा येथील अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आणि तपासात कोणतीही कसर न सोडण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची ‘एसआयटी’ची घोषणा केली आहे. तब्बल ४७ अनुभवी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांची फौज या एका प्रकरणाच्या तपासासाठी तैनात करण्यात आली आहे.

परतवाडा पोलीस ठाण्यात १३ एप्रिल रोजी रात्री नोंदवण्यात आलेल्या या गुन्ह्यात पोक्सो व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कडक कलमांन्वये कारवाई सुरू आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि समाजातील वाढता संताप लक्षात घेता, सहायक पोलीस अधीक्षक तथा आयपीएस डॉ. शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करणार आहे. विशेष म्हणजे, या पथकात सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध पोलीस ठाण्यातील तज्ज्ञ कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात तीन पोलिस निरीक्षक, चार सहायक पोलिस निरीक्षक व तीन पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. 

​आक्रमक पाऊल: कोणालाही सोडणार नाही!
​पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की, जोपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत या पथकातील कोणत्याही कर्मचाऱ्याला इतर कोणतेही काम दिले जाणार नाही. याचाच अर्थ, पोलीस आता पूर्ण ताकदीनिशी केवळ या गुन्ह्याचा छडा लावण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. अश्लील व्हिडिओ तयार करणारे, त्यात सहभागी असणारे आणि ते व्हायरल करून पीडितांच्या सन्मानाशी खेळणाऱ्या प्रत्येकाचा आता ‘हिशोब’ चुकता केला जाणार आहे.

Web Title : परतवाड़ा अश्लील वीडियो मामला: एसआईटी गठित, और गिरफ्तारियां होंगी

Web Summary : परतवाड़ा अश्लील वीडियो मामले की जांच के लिए 47 अधिकारियों की एक विशेष जांच टीम (एसआईटी) का गठन किया गया है। पुलिस वीडियो बनाने और फैलाने में शामिल सभी लोगों को न्याय के कटघरे में लाने के लिए दृढ़ संकल्पित है, और सिर्फ इसी मामले पर ध्यान केंद्रित कर रही है।

Web Title : Paratwada Obscene Video Case: SIT Formed, Expect More Arrests

Web Summary : A Special Investigation Team (SIT) of 47 officers has been formed to investigate the Paratwada obscene video case. Police are determined to bring all involved in creating and spreading the videos to justice, focusing solely on this case.