पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:06 IST2026-04-15T15:04:40+5:302026-04-15T15:06:14+5:30

सप्टेंबर २०२५ रोजी पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात संरक्षण करार झाला होता. या करारानुसार जर एखाद्या देशावर हल्ला झाला तर तो हल्ला या दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल

Pakistan sent 13,000 soldiers; now Saudi Arabia has given 3 billion dollars, how much does one soldier cost? | पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?

पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?

सौदी अरेबियानंपाकिस्तानी सैनिकांची बोली लावली आहे. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानं रियादला १३ हजार सैनिक पाठवले, त्यानंतर लगेचच सौदीने इस्मालाबादसाठी ३ बिलियन डॉलर म्हणजेच २.७ लाख कोटी रक्कम देण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही देशातील कराराचा भाग म्हणून याकडे पाहिले जाते. २०२५ साली सौदीने पाकिस्तानसोबत संरक्षण करार केला होता. या करारातून सौदीची सुरक्षा व्यवस्था मजबूत झाली तर पाकिस्तानला त्यातून आर्थिक लाभ मिळाला.

रिपोर्टनुसार, सौदीने पाकिस्तानला ३ अब्ज डॉलर देण्याची घोषणा अशावेळी केली जेव्हा पाकिस्तानने त्यांचे १३ हजार सैनिक सौदीत सुरक्षेसाठी पाठवले. त्यामुळे पाकिस्तानने त्यांच्या जवानांची बोली लावली का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पाकिस्तानला एका आठवड्याच्या आत ही अतिरिक्त आर्थिक मदत पोहचवली जाईल. त्याशिवाय सौदीने पाकिस्तानला याआधी जे कर्ज दिले होते. ते परत फेडण्यासाठीची मुदतही दिली आहे.

पाकिस्तान आणि सौदीत संरक्षण करार

सप्टेंबर २०२५ रोजी पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात संरक्षण करार झाला होता. या करारानुसार जर एखाद्या देशावर हल्ला झाला तर तो हल्ला या दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. या संरक्षण करारामुळे सौदी अरेबियाने स्वतःला अणुछत्रीखाली आणले आहे. कारण पाकिस्तान हा सुमारे १५० अण्वस्त्रे असलेला एक अण्वस्त्रधारी देश आहे. या करारामुळे आखातात सौदीची सुरक्षा व्यवस्था वाढली. दुसरीकडे सौदीने पाकिस्तानला आर्थिक मदत करण्याची घोषणा केली. सौदीने पाकिस्तानात हेल्थ आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली परंतु करारानंतर ७ महिने कुठलीही गुंतवणूक केली नव्हती. परंतु आता इराण युद्धाचा धोका पाहता पाकिस्तानने रियादमध्ये त्यांचे सैनिक पाठवले आहे. त्यासाठी सौदीने ३ अब्ज डॉलर अतिरिक्त आर्थिक मदत पाकिस्तानला जारी केली आहे.

दरम्यान, सैनिकांच्या संदर्भात विचार केल्यास सौदी अरेबियाने एका पाकिस्तानी सैनिकाची किंमत २० कोटी ठेवली आहे. पाकिस्तान सध्या एका गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. संयुक्त अरब अमिरातकडून (UAE) घेतलेल्या ३.५ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करण्याचा दबाव त्याच्यावर आहे. UAE ने पाकिस्तानकडे या महिन्याच्या अखेरपर्यंत पैशांची मागणी केली आहे. त्यात इराण युद्धामुळे पाकिस्तानमध्ये महागाई वाढली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला आधीच धमकी दिली आहे. परिणामी निधी उभारण्यासाठी पाकिस्तानकडे फार कमी पर्याय उरले आहेत.

 

Web Title : ईरान तनाव के बीच सऊदी ने सैनिकों के लिए पाकिस्तान को अरबों दिए

Web Summary : ईरान तनाव के बीच पाकिस्तान ने सऊदी अरब को 13,000 सैनिक भेजे। इसके बाद सऊदी अरब ने पाकिस्तान को 3 अरब डॉलर दिए, जिससे प्रतीत होता है कि प्रत्येक सैनिक का मूल्य लगभग 200,000 डॉलर है। यह 2025 में दोनों देशों के बीच हुए रक्षा समझौते के बाद हुआ है, जिससे सऊदी सुरक्षा बढ़ी और पाकिस्तान को आर्थिक राहत मिली।

Web Title : Saudi Pays Pakistan Billions for Troops Amid Iran Tension

Web Summary : Pakistan sent 13,000 troops to Saudi Arabia amidst Iran tensions. Saudi Arabia then provided $3 billion to Pakistan, seemingly valuing each soldier at approximately $200,000. This follows a 2025 defense pact between the nations, boosting Saudi security and offering Pakistan economic relief amid financial struggles.